SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास कामांच्या पार्श्वभूमीवर भव्य कृतज्ञता मेळाव्याचे आयोजनश्री अंबाबाई मंदिर परिसरातील विविध कामकाजाचा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणारकोल्हापूर : पाण्यासाठी सभापती विशाल शिराळेंचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; चंबुखडी टाकीवरून थेट नियोजनमाधुरीसाठी आंदोलन केलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : आमदार यड्रावकरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहाडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या रणवीर पाटीलला १३.३६ लाखांचे पॅकेजकोल्हापुरात होणार 'श्री राम कथा' आणि 'श्री राम यज्ञा'चे भव्य आयोजनपंजाबमध्ये 'डबल इंजिन' सरकारची गरज; नाभा मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध: जसविंदर सिंग नाभागोकुळ दूध संघ: ६४४ अपात्र संस्थांसाठी सतेज पाटील गट आता सर्किट बेंचमध्येप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलला संत सोपानकाका स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील शाळा पुरस्कार

जाहिरात

 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलला संत सोपानकाका स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील शाळा पुरस्कार

schedule18 Jun 26 person by visibility 260 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलला शाळेतील स्वच्छता, परिसराचे सौंदर्यीकरण, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘संत सोपानकाका स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील शाळा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे वितरण महाराष्ट्राचे *शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संजयजी चंदूकाका जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

यावेळी  दादासाहेब लाड  आर वाय पाटील शैक्षणिक क्षेत्रातील विविध संघटनाचे पदाधिकारी शिक्षण तज्ञासह शिक्षण प्रेमी उपस्थित होते. शाळेला रोख रक्कम ५०००/- रुपये, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच स्वच्छता, हरित परिसर निर्मिती, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाणीव, शिस्त आणि स्वच्छतेची सवय रुजविण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची दखल घेऊन शाळेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 शाळेच्या मुख्याध्यापिका  एस आर पाटील यांनी  हा सन्मान संपूर्ण शाळा परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. या यशाबद्दल उपमुख्याध्यापक  आर जी घाटगे, पर्यवेक्षक  भोई ,  आंबर्डेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी आणि पालक या सर्वांचे अभिनंदन व आभार. पालकांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
या पुरस्कारामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून भविष्यातही स्वच्छ, सुंदर आणि उपक्रमशील शाळा म्हणून आपली ओळख अधिक दृढ करण्याचा निर्धार शाळा प्रशासनाने व्यक्त केला.

आमचे मार्गदर्शक विनोदकुमार जी लोहिया,  निर्मलकुमार जी लोहिया, उत्कर्षा जी पाटील, मा. नितीनजी वाडीकर, सचिव  पी एस हेरवाडे, सह सचिव  एस एस चव्हाण तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes