SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांचा भावपूर्ण निरोप समारंभ महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 71 नागरिकांचे अर्ज दाखलखासदार धनंजय महाडिकांचा पुढाकार! आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मानधन रचनेत बदल करण्याची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणीसतेज पाटील यांचा वाढदिवस होणार लोकोत्सवदेशाला जगज्जेता बनवण्यासाठी सज्ज व्हा! ४६ व्या वर्धापनदिनी नामदार चंद्रकांतदादा पाटलांची कार्यकर्त्यांना सादअखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग स्पर्धा २०२५-२६: स्पर्धेवर पंजाबच्या विद्यापीठांचे वर्चस्वआम आदमी पार्टीचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांचा भाजपमध्ये प्रवेशनोव्हेंबरमध्ये मुंबईत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव : मंत्री ॲड.आशिष शेलारकोल्हापूर जिल्ह्यात 18 एप्रिलपर्यंत बंदी आदेश लागूशिवाजी विद्यापीठात १० एप्रिलपासून फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह

जाहिरात

 

महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 71 नागरिकांचे अर्ज दाखल

schedule06 Apr 26 person by visibility 97 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी व त्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याची 5 तारीख रविवारी आल्याने सदरचा जनता दरबार आज महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे आयोजित करण्यात आला. या जनता दरबारात 71 नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत अर्ज दाखल केले.

या जनता दरबारात महापौर रुपाराणी निकम यांनी नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. तसेच प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जनता दरबारास प्रारंभ करण्यापूर्वी महापौर रुपाराणी निकम यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जनता दरबारास सुरुवात करण्यात आली.

 महापौर रुपाराणी निकम यांनी बोलताना कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने खूप चांगले काम केले आहे. मागील जनता दरबारातील बऱ्याचशा तक्रारी निर्गत झालेल्या आहेत. कोल्हापूर शहराची प्रगती पाहत असता शहरातील अतिक्रमण हा विषय गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. रंकाळा तलावाशेजारी दोन दिवसात 17 गाड्याबाबत ज्या घटना घडलेल्या आहेत. त्या निदंनीय आहेत. असे अतिक्रमण शहरामध्ये यापुढे चालणार नाही. शहरामध्ये अतिक्रमणांमध्ये कोठेही चुकीच्या अतिक्रमणामध्ये लोकप्रतिनिधी येणार नाहीत. शहर अतिक्रमण मुक्त करण्याची लवकरच मोहिम हाती घेण्यात येणार आहे. शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते स्वत:हून नागरीकांनी काढून घ्यावेत असे मी आवाहन करते. अन्यथा 15 दिवसानंतर अतिक्रमण मोहिम शहरामध्ये राबवली जाईल यांची संबंधितांनी नोंद घ्यावी. मागील जनता दरबारात 138 तक्रारी आल्या होत्या. त्यामधील 102 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित न्यायप्रविष्ट व कौटुंबिक वादातील आहेत. मागील जनता दरबारापेक्षा यावेळी तक्रारदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे नागरीकांची काम आता होत आहेत याबाबत मी समाधानी आहे.    

 या जनता दरबारामध्ये विविध विभागाचे 71 अर्ज असून यामध्ये नगररचना विभागाशी 22, आस्थापना विभागाशी 3, पाणी पुरवठा विभागाशी 3, शहर अभियंता कार्यालयाशी संबंधित 7, सामान्य प्रशासन विभागाशी 7, घरफाळा विभागाशी 5, आरोग्य विभागाशी 2, उद्यान विभागाशी 9, परवाना विभागाशी 1, इस्टेट विभागाशी 2, अतिक्रमण विभागाशी 4, केएमटी विभागाशी 1, रचना व कार्यपध्दती विभागाशी 2, शिक्षण विभागाशी 1 व आरोग्य प्रशासन विभागाशी 2 अर्ज दाखल झाले आहेत.

यावेळी उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, नगरसचिव सुनील बिद्री, जल अभियंता हर्षजीत घाटगे, करनिर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर अभियंता सरेश पाटील, महादेव फुलारी, अरुण गुजर, निवास पोवार, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, नगरसेवक व नगरसेविका, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes