शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचे अनिल साळोखे अध्यक्ष, विजय इंगवले उपाध्यक्ष
schedule17 Apr 25 person by visibility 251 categoryउद्योग

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल विजयराव साळोखे यांची, तर विजय भीमराव इंगवले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
कोल्हापूर शहर सहकारी संस्था उपनिबंधक निलेश डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीला संचालक विजय गोविंद पाटील, राजेंद्र विष्णू चव्हाण, साताप्पा बापू साळोखे, दीपक नारायण काशीद, सचिन पुंडलिक नाळे, शशिकांत सखाराम साळुंखे, सागर नागनाथ चौरे, विनय संभाजीराव पाटील, सागर चिमाजी लांडे, सुरेश आण्णाप्पा पाटील, राकेश अण्णासो डोंगरे, शीतल प्रमोद सरनाईक, वंदना पंडित गुरव, चिटणीस नितीन देवाप्पा लोहार आणि पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.