SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : भुदरगड भरारी पथकाची धडक कारवाई; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त; उमेदवारावर आचारसंहिता भंग गुन्हा दाखल

schedule01 Feb 26 person by visibility 273 categoryगुन्हे

गारगोटी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असताना भुदरगड तालुक्यातील भरारी पथकाकडून तब्बल 14 लाख 62 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉ. युवराज येडुरे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला  आहे.

डॉ. युवराज येडुरे हे भुदरगड तालुक्यातील कुर पंचायत समिती गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्यामार्फत कागल तालुक्यातील बोरवडे येथे कृषी साहित्य मिळण्यासाठी फॉर्म भरून घेत असल्याची व साहित्य वाटप होणार असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना याबाबत बोरवडे येथे बोलवण्यात आले होते. शनिवार, 31 जानेवारी रोजी सकाळपासून फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही व दुपारी साहित्य वाटप होणार असल्याची खात्री भरारी पथकाने केल्यानंतर पोलीस विभागाच्या उपस्थितीत दुपारी धाड टाकण्यात आली.

▪️14 लाखाचा मुद्देमाल जप्त
भरारी पथकाला कारवाईच्या वेळी शेतीला तणनाशक/औषध फवारणीसाठी वापरण्यात येणारे 504 पंप आढळून आले. या साहित्याची अंदाजे किंमत 14 लाख 62 हजार आहे. हे साहित्य कार्पोरेट सामाजिक जबादारी (CSR) मधून मिळाल्याचे व अशासकीय संस्थेद्वारे (NGO) वाटप करत असल्याचे डॉ. येडुरे यांच्याकडून सांगण्यात आले. तथापि आचारसंहिता काळात उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीकडून मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती किंवा साहित्य वाटप करण्यास प्रतिबंध असल्यामुळे भरारी पथकाने सर्व साहित्य जप्त केले व मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये डॉ. युवराज येडुरे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा शनिवारी रात्री उशिरा नोंदवण्यात आला.

▪️साहित्य वाटप केल्याचे निष्पन्न
 शनिवारी दुपारपासून कृषी पंपाचे वाटप केल्याचे व्हिडीओ भरारी पथकाला मिळाले आहेत. तसेच मुदाळ तिट्टा येथील निवडणूक विभागाने स्थिर सर्वेक्षण पथकात लावलेल्या सी सी टीव्ही कॅमेऱ्यात विविध गावातील शेतकरी कृषी पंप घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमांतर्गत नेमण्यात आलेल्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून मुरगूड पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा भुदरगड-आजरा उपविभागाचे प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes