SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक नारळ दिन: महत्त्व आणि उपयोगिताकुपोषित बालकांना जिल्हा परिषद सदस्य घेणार दत्तककर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचे सानुग्रह अनुदानआदर्श गणेशोत्सव म्हणून कोल्हापूरची ओळख व्हावी : आ. राजेश क्षीरसागरकोल्हापुरात खड्डे बुजविण्यासाठी ‘इन्स्टा रोड पॅचर’चा प्रयोगकोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदे त्वरित भरा; आस्थापना खर्चाची अट शिथिल करा: आमदार सतेज पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी‘गुजरीचा गोविंदा’ च्या ४० व्या वर्षा निमित भव्य कार्यक्रम - बिग बॉस मराठी फेम इरिनासह नामवंत कलाकारांची उपस्थिती; लाखाचे भव्य पारितोषिक अन् आकर्षक कार्यक्रमांची मेजवानीउंचगाव येथे वीज बिल भरणा केंद्र तातडीने सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा शिवसेनेचा इशाराजागतिक कीर्तीचे तज्ज्ञ वारणेत आणणार : एन. एच. पाटील; कोरे अभियांत्रिकीत प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतमराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

जाहिरात

 

‘गुजरीचा गोविंदा’ च्या ४० व्या वर्षा निमित भव्य कार्यक्रम - बिग बॉस मराठी फेम इरिनासह नामवंत कलाकारांची उपस्थिती; लाखाचे भव्य पारितोषिक अन् आकर्षक कार्यक्रमांची मेजवानी

schedule31 Aug 26 person by visibility 276 categoryसामाजिक

कोल्हापूर : श्रीकृष्णाच्या बाललीलांमधील गोपाळकाला आणि दहीहंडीची परंपरा ही केवळ मनोरंजनाची बाब नसून, त्यामागे भक्ती, सामूहिकता, श्रमप्रतिष्ठा, एकजूट आणि ‘एकासाठी सर्व, सर्वांसाठी एक’ या भावनेचा आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. याच भक्तीभावनेला आधुनिकतेची जोड देत गेली ३९ वर्षे दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या न्यू गुजरी मित्र मंडळाचा ‘गुजरीचा गोविंदा’ दहीहंडी उत्सव यंदा ४० व्या वर्षात पदार्पण केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील मानाच्या आणि आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या ‘गुजरीचा गोविंदा’ दहीहंडी उत्सवाचे यंदाचे आयोजन अधिक भव्य स्वरूपात करण्यात आले आहे. लाख रुपयांचे भव्य पारितोषिक, थरारक गोविंदा पथकांचा सहभाग, नामवंत कलाकारांची उपस्थिती, नृत्य, ढोल-ताशांचा गजर, आतषबाजी आणि अत्याधुनिक ध्वनी व प्रकाशयोजना यामुळे यंदाच्या उत्सवाची उत्सुकता वाढली आहे. अशी माहिती न्यू गुजरी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण नकाते तसेच दहीहंडी उत्सव कमिटी अध्यक्ष निखिल कटके यांनी दिली.

▪️श्रीकृष्णाच्या बाललीलेतून एकतेचा संदेशदहीहंडीच्या परंपरेला भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलेचा आध्यात्मिक संदर्भ आहे.यासह सामाजिक विचारांचा जागर करत ‘गुजरीचा गोविंदा’ने चार दशकांचा प्रवास पूर्ण केला आहे. काळ बदलला, उत्सवाचे स्वरूप बदलले; मात्र भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकजुटीचा मूळ गाभा कायम ठेवण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.
यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बिग बॉस मराठी फेम रशियन अभिनेत्री  इरिना यांचे विशेष सादरीकरण होणार आहे . त्याचबरोबर डान्स महाराष्ट्र डान्स, सुपर डान्सर-५, वर्ल्ड हिप हॉप चॅम्पियनशिप क्वालिफायर यांसारख्या कार्यक्रमांमधून आपल्या नृत्यकलेची छाप पाडणाऱ्या आदिती जाधव यांच्यासह इतर नामवंत सेलिब्रेटींची उपस्थिती आणि नृत्याचे कार्यक्रम सादर होणार आहेत.

तरुणाईला आकर्षित करणारी ब्रँडेड साऊंड सिस्टीम, डोळे दिपवणारी आतषबाजी, कोल्ड स्पायरो आणि भव्य लाईट शो यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणाने भारून जाणार आहे.
यासह उत्सवामध्ये ‘करवीर गर्जना ढोल पथका’चे विशेष कला सादरीकरण होणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, गोविंदांचा उत्साह आणि ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून जाणार आहे. पारंपरिक वाद्यकलेला व्यासपीठ देतानाच युवा पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचा प्रयत्न यामधून केला जाणार आहे.
सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य
दहीहंडीतील मानवी मनोऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षिततेचा विचार यंदा विशेषत्वाने करण्यात आला आहे. शेवटच्या थरावर चढणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष बेल्टची व्यवस्था करण्यात येणार आहे. उत्सवाचा जल्लोष आणि साहस कायम ठेवताना सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, हा मंडळाचा प्रयत्न आहे.

▪️उत्कृष्ट रीलसाठी विशेष पारितोषिक
यंदाच्या ‘गुजरीचा गोविंदा’ उत्सवाच्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी उत्सवाची उत्कृष्ट रील तयार करणाऱ्या फोटोग्राफर, व्यक्ती अथवा कलाकाराला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे गोविंदा उत्सवातील भक्ती, उत्साह, कलाविष्कार आणि कोल्हापुरी संस्कृतीचे दर्शन नव्या डिजिटल माध्यमातून घडणार आहे.
चार दशकांच्या या प्रवासात ‘गुजरीचा गोविंदा’ने दहीहंडीला केवळ एक क्रीडा अथवा मनोरंजनाचा कार्यक्रम न ठेवता श्रीकृष्ण भक्ती, सांस्कृतिक परंपरा, युवा शक्ती, सामाजिक एकजूट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवून आणला आहे. त्यामुळे यंदाचा ४० वा उत्सव हा मंडळासाठी केवळ वर्धापनदिन नसून, चार दशकांच्या परंपरेचा आणि हजारो गोविंदांच्या सामूहिक भक्ती-शक्तीचा उत्सव ठरणार आहे.यांचा लाभ सर्व कोल्हापूरकर सह पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असे आहवान न्यु गुजरी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes