SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागलच्या ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या पार्थ सुतारने बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले अजिंक्यपदमहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांत परिवर्तनाची सलग परंपरा: डॉ. राजन गवसकोल्हापुरात २७ एप्रिलला महागाईविरोधात रेशन बचाव समितीचा धडक मोर्चा; हजारो नागरिक रस्त्यावर उतरणारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयटीआय जॉब फेअर ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडआप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशी यांची निवडपुस्तक : मानवी भावना, ज्ञान आणि संस्कृतीच्या संवादाचे प्रभावी माध्यमइंग्रजी भाषा दिन: जागतिक संवादाचे माध्यम'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'चे नियम धाब्यावर बसवून कोल्हापुरात वृक्षहत्या; सुराज्य अभियानाची फौजदारी कारवाईची मागणी५०० हून अधिक भाताचे प्रकार बनवून कोल्हापुरात नवा जागतिक विक्रम रचणार; मास्टर शेफ दिग्विजय भोसलेंची घोषणाकृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभ

जाहिरात

 

कोल्हापूर : घरफाळा करात ३० जूनपर्यंत ६ टक्के सवलत

schedule22 Apr 26 person by visibility 218 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी देयके तयार करण्यात आली आहेत. चालू वर्षाच्या मागणीवर ६ टक्के सवलत योजना लागू करण्यात आली असून शहरातील सर्व मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. ही सवलत दि. ३० जून २०२६ पर्यंतच लागू राहणार आहे.

          सवलतीचा लाभ घेण्यासाठी मिळकतधारकांनी महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात जाऊन करदाता क्रमांक सांगून चालू वर्षाचा घरफाळा भरावा. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे तसेच ऑनलाईन पध्दतीने कराचा भरणा करण्यासाठी महानगरपालिकेच्या https://propertytax.kolhapurcorporaction.gov.in/KMCOnlinePG/PropSearch.aspx या अधिकृत संकेतस्थळावरूनही घरफाळा भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय नागरी सुविधा केंद्रांमध्ये किओस्क मशीनद्वारे ऑनलाइन भरणा करता येणार असून, यंदाच्या देयकांवर क्यूआर कोड छापण्यात आलेला आहे. त्याद्वारेही नागरिकांना सुलभ पद्धतीने घरफाळा भरता येणार आहे.

          तरी मिळकतधारकांनी विलंब न करता घरफाळा भरून ६ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes