दुधाळी येथील 6 द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत कार्यान्वीत करा : के.मंजूलक्ष्मी
schedule09 Jan 25 person by visibility 432 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाचे अमृत योजनेअंतर्गत पंचगंगा प्रदुषण नियंत्रणासाठी दुधाळी येथे 6 द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम काम सुरू आहे. या सुरु असलेल्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे आजअखेर 95 टक्के काम पूर्ण झालेले असून उर्वरित काम त्वरीत पूर्ण करून सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या.
तसेच सदरचा प्रकल्प जानेवारी 2025 अखेर पूर्ण करुन तो कार्यान्वित करणेच्या सूचना जल अभियंता यांना दिल्या.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता मनिष पवार, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे व संबंधीत ठेकेदार उपस्थिती होते.