SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे : किरीट सोमय्या‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजराडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'एक्सलंट' श्रेणीजन्म-मृत्युचे दाखले वितरणात दक्षता बाळगा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सूचनागोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणारसंवाद कौशल्य हीच प्रभावी प्रशासनाची गुरुकिल्ली : डॉ. आलोक जत्राटकररेड अलर्ट असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या नाहीत; सतेज पाटील यांचा विधिमंडळात सवाल कोल्हापूर: ॲड. विवेकानंद घाटगे यांचा ८ जुलै रोजी ग्रंथतुला करून जाहीर सत्कारकोल्हापूर: बंद घराचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या; २.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगतसतर्कतेचा इशारा: गगनबावडा तालुक्यातील 'वेसरफ' तलाव १००% भरला; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 3.15 टीएमसी पाणीसाठा

schedule06 Jul 26 person by visibility 156 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.15 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून  पाण्याचा विसर्ग निरंक आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी,खडक कोगे व राशिवडे,  तुळशी नदीवरील- कसबा बीड व आरे,  कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, वालोली, कांटे व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, सांगरुळ, मांडुकली,  वारणा नदीवरील- कोडोली व मांगलेसावर्डे, दूधगंगा नदीवरील-  दत्तवाड व सिध्दनेर्ली, वेंदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापुर, सुरुपली, गारगोटी, म्हसवे, करडवाडी व शेणगाव, हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव व घटप्रभा नदीवरील- कानडे- सावर्डे असे एकूण 44 बंधारे पाण्याखाली आहे. 

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 3.15 टीएमसी, तुळशी 1.34 टीएमसी, वारणा 7.71 टीएमसी, दूधगंगा 3.13 टीएमसी, कासारी 1.05 टीएमसी, कडवी 1.01 टीएमसी, कुंभी 1.11 टीएमसी, पाटगाव 1.44 टीएमसी, चिकोत्रा 0.53 टीएमसी, चित्री 0.63 टीएमसी, जंगमहट्टी 0.49 टीएमसी, घटप्रभा 1.55 टीएमसी, जांबरे 0.57 टीएमसी, आंबेआहोळ 0.69 टीएमसी, सर्फनाला 0.39 टीएमसी, धामणी 1.05 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.11 फूट, सुर्वे 31 फूट, रुई 60.6 फूट, इचलकरंजी 56.8 फूट, तेरवाड 50.9 फूट, शिरोळ 40.3 फूट, नृसिंहवाडी 36 फूट, राजापूर 26.3 फूट तर नजीकच्या सांगली  12.6 फूट व अंकली 15.9 फूट अशी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes