SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
करवीर तालुक्यातील दोन देवालयांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; ४.४३ कोटींचा निधी; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश​"आम्ही सगळे जुळे भाऊ!"; गोकुळ निवडणुकीत महायुतीचे विरोधकांना जोरदार आव्हानमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावारणा विद्यापीठाचा महारोजगार मेळावा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललासार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जगोकुळ निवडणुकीत सत्यजित पाटील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत भूमिका केली स्पष्टजैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे : संतोष मोरेमहामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा; आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणीशेतकऱ्यांनी घाबरू नये, सरकार पाठीशी; लवकरच दुष्काळ जाहीर होणार : हसन मुश्रीफमोफत आरोग्यसेवेसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जाहिरात

 

‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ अंतर्गत 1 हजार 88 आरोग्य शिबिरे

schedule24 Sep 26 person by visibility 164 categoryआरोग्य

कोल्हापूर : ‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 14 ते 22 सप्टेंबर या कालावधीत एकूण 1 हजार 88 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांचा 53 हजार 967 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

या शिबिरांमध्ये 36 हजार 90 पुरुष, 25 हजार 613 महिला तर 5 हजार 382 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हृदयविकार असलेल्या 2 हजार 465 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच कायचिकित्सा विभागात 24 हजार 462, शल्यतंत्र विभागात 504, अस्थिविकार विभागात 1 हजार 642, बालरोग विभागात 2 हजार, स्त्रीरोग विभागात 1 हजार 162, कान-नाक-घसा विभागात 928, नेत्रविकार विभागात 1 हजार 637, त्वचाविकार विभागात 891 आणि इतर विकार व व्याधींसाठी 1 हजार 916 रुग्णांनी उपचार व तपासणीचा लाभ घेतला.

या उपक्रमांतर्गत आयुष्मान भारत व आभा कार्ड सुमारे 4 हजार 61 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली, तर 1 हजार 947 जणांना गोल्डन कार्डचा लाभ देण्यात आला. रक्तदान शिबिरांमध्ये 1 हजार 991 इतक्या रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तसेच 6 हजार 315 रुग्णांची रक्त तपासणी, 1 हजार 380 रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली. एंजिओग्राफी व इतर तपासण्यांसाठी 268 रुग्ण आले. विशेष म्हणजे या उपक्रमात अवयवदानासाठी 187 जणांनी लिखित संमतीपत्र दिले, तर 262 रुग्णांना पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात पाठविण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes