SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

“देशाच्या जनसांख्यिकीय लाभांशाची पोषकता वाढविण्यासाठी प्रगत अनुदेशन पद्धतीद्वारे कौशल्य निर्मितीची गरज” : प्रा.डॉ.किरणकुमार शर्मा

schedule01 Feb 26 person by visibility 274 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर येथे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (पीएम.उषा) “प्रगत अनुदेशन पद्धती’’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे दि ३० व ३१ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते . यावेळी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर स्कूल ऑफ  नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.किरणकुमार शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी त्यांनी सद्यस्थितीमध्ये बदलत्या सामाजिक गरजा लक्षात घेऊन शिक्षणपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.

  याप्रसंगी शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.चेतना प्र.सोनकांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रगत अनुदेशन पद्धतीचे महत्व विशद केले.

या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे येथील माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ.नितीन पाटील ,श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई येथील डॉ.महेश कोलतामे, शिक्षणशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील डॉ वैभव जाधव,एमआयटी.एडीटी विद्यापीठ,पुणे येथील डॉ.प्रिया सिंग व प्राणीशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथील प्रा.डॉ .एम.पी.भिलावे यांनी प्रगत अनुदेशन पद्धती या विषयावर तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे समन्वयक डॉ.विद्यानंद खंडागळे यांनी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी  इतिवृत्तांत सादर केला  व सहसमन्वयक म्हणून सारिका पाटील यांनी कार्य पाहिले. सूत्रसंचालन बी.एड ,एम.एड (एकात्मिक) प्रशिक्षणार्थी आकांक्षा पाटील व प्रांजली भोंग, किशोर शाम यांनी केले. प्रस्तुत कार्यशाळेसाठी अधिविगातील  डॉ.रुपाली संकपाळ,शिक्षक ,संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यशाळेसाठी विविध शैक्षणिक संस्थेमधून ७४ प्रतिसादक उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes