SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेकडून उचगावमधील २०४ अनधिकृत बांधकामांना पुन्हा नोटीसकोल्हापुरात वृद्धाला लुटणारी सराईत इराणी टोळी जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्तराज्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल 92.09 टक्केकोल्हापूर: जमिनीच्या वादातून झालेल्या खुनातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटकनेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के भाविक, पर्यटक, महिलांसाठी खासबाग मैदान, आणि ताराबाई पार्क इथं बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे रविवार होणार लोकार्पणपन्हाळगड परिसरात 10 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागूसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेचा हातोडा कधी पडणार?, शिवसेनेसह जिल्हाप्रमुखांचा सवालगोकुळच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून समाजात चुकीचा संदेश पसरविणाऱ्या निवडणूक प्राधिकरणाचे अधिकारी अशोक गाडे, दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्यावर कडक कारवाई करामानवतेचा आधारस्तंभ: जागतिक रेड क्रॉस दिवस

जाहिरात

 

कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 984 कोटींचा निधी मंजूर, लवकरच दुहेरीकरणाचे स्वप्न पूर्ण होणार : खासदार धनंजय महाडिक

schedule12 Feb 26 person by visibility 909 categoryदेश

कोल्हापूर  : कोल्हापूर ते मिरज हा रेल्वे मार्ग एकेरी आहे. त्यामुळे नव्या गाड्या कोल्हापुरातून सुरू करणे तसेच रेल्वे गाड्यांचे क्रॉसिंग याला मर्यादा येत होत्या. त्यामुळे कोल्हापूर ते मिरज या सत्तेचाळीस किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण व्हावे ही कोल्हापूरकरांची प्रदीर्घकाळची मागणी आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने या प्रश्नासाठी पाठपुरावा केला. त्यातून कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. सुमारे 47 किलोमीटरच्या या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय 984 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

 त्यामुळे नजीकच्या काळात कोल्हापूर मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण होईल, याची खात्री वाटत आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. एकदा का कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले की अनेक लांब पल्ल्याच्या नव्या रेल्वे गाड्या कोल्हापुरातून सुरू होऊ शकतील. 

शिवाय वंदे भारत सारख्या नव्या आलिशान रेल्वे गाड्या कोल्हापूरला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली सुमारे दोन दशके कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व्हावे ही मागणी होती.

 त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले होते. खासदार महाडिक यांनी या प्रश्न संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण लवकरच पूर्ण होईल, आणि कोल्हापूरकरांची मागणी लवकरच पूर्ण होईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes