कोल्हापुरातील शिवाजी पेठेत तरुणाचा खून
schedule24 Apr 25 person by visibility 1038 categoryगुन्हे

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील संध्यामठ परिसरात प्रशांत
भीमराव कुंभार (वय ३२, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) या तरुणाचा चाकूने भोसकून खून झाला. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला. प्रशांत याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आर्थिक वादातून हा खून झाल्याचे समजते.
प्रशांत कुंभार हा कॉम्प्युटर आणि प्रिंटर दुरुस्तीचे काम करीत होता. नरेंद्र साळोखे याच्याशी दोन वर्षांपासून पैशांच्या देवाणघेवाणीतून त्याचा वाद होता. साळुंखे याने वाद मिटवण्यासाठी त्याला बुधवारी रात्री संध्यामठ परिसरात बोलवून घेतले होते. मात्र, चर्चेतून वाद विकोपाला गेला आणि साळोखे याने प्रशांत कुंभार यांच्या पाठीत आणि पोटात चाकूने वार करून त्याचा खून केला .
प्रशांत कुंभार याच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी नरेंद्र साळोखे या संशयिताने चाकूने भोसकून खून केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्याचा तपास सुरू आहे.