SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवडवनकायदे, जैवविविधता व ड्रोन प्रशिक्षणावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात कोल्हापुरात उद्यापासून रमजान पर्वाला प्रारंभ; आज रात्री पहिली 'तरावीह'डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावकेआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथनछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार; शासनाकडून निधी मंजुरराज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशनआयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पनाकोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियानमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

जाहिरात

 

कातळशिल्पांच्या संशोधनाकरिता वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन : मंत्री ॲड. आशिष शेलार

schedule18 Feb 26 person by visibility 109 categoryराज्य

मुंबई : कोकण किनारपट्टी व पठारावर आढळणाऱ्या हजाराहून अधिक प्राचीन कातळशिल्पांच्या (जिओग्लिफ्स) सखोल संशोधन, दस्तऐवजीकरण आणि संरक्षणासाठी ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून  एकूण 14 कोटी 62 लाख 32 हजार 671 रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

कोकणातील ही कातळशिल्पे आद्यऐतिहासिक मानवाची जीवनपद्धती, संस्कृती आणि त्या काळातील जैविक व सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या वारशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, यासाठी कोकणातील कातळशिल्पांचा नामांकन प्रस्ताव युनोस्कोकडे पाठवण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती प्रस्ताव ही पाठवण्यात आल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

कोकणातील कातळशिल्पांविषयी संशोधन, नवीन  स्थळांचा शोध आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्क 2026 ते 2029 या कालावधीत कार्यरत राहणार आहे. या अंतर्गत मुंबई आणि रत्नागिरी येथे दोन शाखा स्थापन केल्या जाणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

मुंबई शाखेमार्फत आंतरराष्ट्रीय संशोधन साहित्याचा अभ्यास, माहितीकोश (डेटाबेस) निर्मिती, युनेस्को मानकांनुसार निकष विकसित करणे तसेच संशोधन लेखन केले जाणार आहे. तर रत्नागिरी शाखेमार्फत क्षेत्रीय सर्वेक्षण, GPS आधारित नकाशांकन, ड्रोनद्वारे कातळशिल्पांचे दस्तऐवजीकरण, स्थानिक लोककथांचे संकलन आणि जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच या अभ्यासातून ही कातळशिल्प किती जूनी आहेत त्यांचे निर्माण कोणत्या काळात झाले, याचे संशोधन ही या निमित्ताने करण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी मनुष्यबळ, वैज्ञानिक चाचण्या, उपकरणे, वाहतूक आणि इतर बाबींवर खर्च केला जाणार असून. प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांच्याकडे देण्यात आली असल्याचेही मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

दरम्यान, या कातळशिल्पांना जागतिक स्तरावर प्रसिद्ध मिळावी व ही कला, त्यामध्ये दडलेला अती प्राचीन इतिहास हा जगासमोर यावा म्हणून एक विशेष माहीती पट हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा तयार करण्यात येणार असल्याचे ही मंत्री ॲङ शेलार यांनी सांगितले. यामुळे कोकणातील कातळकला जागतिक पातळीवर अधोरेखित होऊन कोकणातील भविष्यातील पर्यटनास मोठा हातभार लागणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes