SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवडवनकायदे, जैवविविधता व ड्रोन प्रशिक्षणावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात कोल्हापुरात उद्यापासून रमजान पर्वाला प्रारंभ; आज रात्री पहिली 'तरावीह'डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावकेआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथनछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार; शासनाकडून निधी मंजुरराज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशनआयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पनाकोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियानमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियान

schedule18 Feb 26 person by visibility 134 categoryराज्य

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली CSR उपक्रमांतर्गत Rotary Club या स्वयंसेवी संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या विशेष शस्त्रक्रिया अभियानासाठी रोटरी क्लबच्या विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये प्रामुख्याने स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, कान-नाक-घसा, मूत्ररोग, ऑर्थोपेडीक तसेच इतर सर्वसाधारण शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि हातकणंगले या सहा तालुक्यांतील तपासणीत पात्र ठरलेल्या रुग्णांवर 9 ते 14 मार्च या कालावधीत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

शस्त्रक्रियेसाठी इच्छुक रुग्णांनी संबंधित तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तपासणी करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप माने यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes