‘कॅमेरा तंत्र’वर उद्या मंगळवारी विद्यापीठात कार्यशाळा
schedule22 Dec 25 person by visibility 60 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने कॅमेरा तंत्र या विषयावर मंगळवार दि. 23 रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेत कॅमेरा तज्ज्ञ सुधीर बोरनाक कॅमेरा हाताळणीचे प्रशिक्षण देणार आहेत. ही कार्यशाळा अध्यासनाच्या इमारतीत सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे.
कॅमेर्याबाबत कुतूहल असणार्यांनी कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.





