SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यतामाजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

जाहिरात

 

‘गोकुळ’ मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

schedule14 Apr 26 person by visibility 213 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील विकास कक्ष कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 यावेळी गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक डॉ. सुजित मिणचेकर, व संचालक मंडळाच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

  याप्रसंगी गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील विविध जाती-धर्मांना एकत्रित ठेवण्याचे कार्य केले. सामाजिक न्याय, दलित हक्क तसेच भारतीय संविधान निर्मितीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा समावेश करून त्यांनी देशाच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला, असे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एम. पी. पाटील यांनी केले, तर आभार डॉ. दयानंद काळे यांनी केले.

 या कार्यक्रमास गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश पाटील, मुरलीधर जाधव, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, डॉ. दयावर्धन कामत, संकलन सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. एम. पी. पाटील, एस. आर. पाटील, अशोक पुणेकर तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes