SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
फुटबॉलचा नवा बादशहा 'स्पेन'! मेस्सीच्या अर्जेंटिनाला नमवून १६ वर्षांनंतर रचला इतिहासबुद्धीच्या पटावरचा उत्सव: 'आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन'संपत पाटील, अमोल माने यांची काँग्रेस प्रवक्तेपदी निवड'छात्रों की गूंज': पेपर फुटीवरून काँग्रेस आक्रमक; केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’अंतर्गत बोधगयासाठी विशेष तीर्थयात्रा रेल्वेचे २० जुलै रोजी प्रस्थानमहिला डॉक्टरवरील हल्ला महागात: हायकोर्टाचा दणका, जामीन रद्द होताच शिवसेनेच्या नगरसेवकाचे सरेंडर!फुटबॉलचा महाकुंभ: स्पेन-अर्जेंटिना महामुकाबला आज; मेस्सी विरुद्ध यमाल ऐतिहासिक लढाई!गोलचा थरार, साकाची हॅट्ट्रिक! इंग्लंडने फ्रान्सला हरवून पटकावले कांस्यपदकजागतिक बँक खाते दिवस: आर्थिक स्वातंत्र्याचा पायाशरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा रोलर पूजन सोहळा उत्साहात

जाहिरात

 

सुहास देशपांडे यांना इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी.

schedule18 Jul 26 person by visibility 238 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक  सुहास प्रभाकर देशपांडे यांनी डी. वाय. पाटील अॅग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी येथून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (लीन मॅनेजमेंट) या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

त्यांच्या संशोधनाचा विषय "एनहान्सिंग इंडियन एसएमईज थ्रू लीन मॅन्युफॅक्चरिंग फॉर सस्टेनेबल ग्लोबल ग्रोथ" असा असून, भारतीय लघु व मध्यम उद्योगांना (एसएमईज) लीन मॅन्युफॅक्चरिंगच्या तत्त्वांचा अवलंब करून जागतिक स्तरावर शाश्वत आणि स्पर्धात्मक वाढ साध्य करण्यासाठी उपयुक्त धोरणांचा त्यांनी अभ्यास केला आहे. 

त्यांना या संशोधनासाठी प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, तर डॉ. एम. एम. नरके यांनी सह-मार्गदर्शक म्हणून मोलाचे सहकार्य केले.

 सुहास देशपांडे हे उद्योगक्षेत्रातील अनुभवी उद्योजक असून, त्यांच्या व्यावहारिक अनुभवाला संशोधनाची जोड मिळाल्यामुळे त्यांच्या प्रबंधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील प्र कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू  डॉ ए के गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes