राष्ट्रीय स्तरावरील 'क्रिएट ' स्पर्धेमध्ये श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कोल्हापूर द्वितीय पारितोषिक
schedule17 Sep 24 person by visibility 435 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : कलिका स्टिल , जालना तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील 'क्रिएट ' स्पर्धेमध्ये श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कोल्हापूर ला ७५०००/- रुपये द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत एकूण ५० कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
ही स्पर्धा ३ स्टेज मध्ये घेण्यात आली. आमच्या काॅलेजचे २ संघ या ३ स्टेजमधुन शाॅर्टलिस्ट झाले होते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वर आधारित या स्पर्धेत कलिका स्टिलचा वापर करून ३'x३' जागेत बसेल असे एक शिल्प साकारायचे होते. या स्पर्धेत आमच्या काॅलेजच्या रंजना तुरे, शांभवी जोशी, शरवत हावळ आणि आयुष मिरजकर यांनी भाग घेतला.
या स्पर्धेस संस्थेचे अध्यक्ष डॉ के. जी. पाटील , कॉलेजचे प्राचार्य सी. एस. दुदगीकर , स्पर्धा समन्वयक प्रा. वंदना पुसाळकर, प्रा. अंजली जाधव आणि प्रा. आय एस पाटील मार्गदर्शन आणि समर्थन दिले.