शिवाजी विद्यापीठाचा सॉफ्टबॉल महिलांचा संघ जाहीर
schedule27 Apr 25 person by visibility 228 categoryक्रीडा

कोल्हापूर : नेल्लूर(आंध्र प्रदेश) येथे दिनांक :30 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 होणाऱ्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल महिला स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ रवाना झाला. या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावरती गेले दहा दिवस विशेष एकत्रित सराव शिबिर झाले, या संघात एकूण 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आले.
संघामध्ये स्वप्नाली वायदंडे (कर्णधार), करिष्मा कुडचे, ऐश्वर्या पुरी, अंजली पवार, साक्षी येटाळे,मृणाल जाधव, वैष्णवी हुळहुळे,सृष्टी शिंदे,सौंशज्ञा माने, सागरीका म्हातो,सलोनी नलवडे, सृष्टी कदम,अनुजा पाटील, श्रावणी चौगुले, निलोफर गौस,सृष्टी देशमुख यांचा समावेश आहे, प्रशिक्षकपदी प्रा.विनायक जाधव तर संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.राम पवार यांची निवड झाली.
संघाला कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरु डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे,क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.