छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींना शिवाजी विद्यापीठात अभिवादन
schedule06 May 25 person by visibility 245 categoryसामाजिक

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात राजर्षींच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. दत्ता मचाले,
डॉ. उमाकांत हत्तीकट, डॉ. किशोर खिलारे, अविनाश भाले, सचिन घोरपडे आदी उपस्थित होते.