SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विनायक भोसले यांचा 'लायन्स गौरव' पुरस्काराने सन्मान गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीकाजीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

जाहिरात

 

गांधीनगर भूमापन कार्यालयाचा 'रामभरोसे' कारभार; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

schedule04 May 26 person by visibility 270 categoryसामाजिक

गांधीनगर : येथील नगर भूमापन कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत करवीर तालुका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रशासनाला धारेवर धरले आहे. गांधीनगर सज्जामध्ये वळीवडे, चिंचवाड, सांगवडे यांसह ड्रोन सर्वेक्षणानंतर वाढलेल्या अतिरिक्त गावांच्या संख्येमुळे कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. असे असतानाही, आठवड्यातून केवळ दोन दिवस (मंगळवार व शुक्रवार) उघडणाऱ्या या कार्यालयात कर्मचारी मोजणीच्या नावाखाली बाहेर असतात. त्यामुळे लांबून येणाऱ्या वृद्ध आणि महिलांना कडक उन्हात रिकाम्या हाती परतावे लागत आहे.

करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या नावे उपअधीक्षक  किरण माने यांना निवेदन दिले. "जर कर्मचाऱ्यांना कार्यालयात बसवून प्रलंबित कामे तात्काळ निकाली काढली नाहीत, तर कार्यालयाला कायमस्वरूपी कुलूप ठोकले जाईल," असा इशारा यावेळी देण्यात आला. यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत, निश्चित केलेल्या दोन्ही दिवशी अधिकारी उपस्थित राहतील आणि प्रलंबित कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले आहे.

यावेळी पोपट दांगट, राजू सांगावकर, योगेश लोहार यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes