SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीकाजीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूरडीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी

जाहिरात

 

जनगणना 2027 अंतर्गत महानगरपालिकेमार्फत जनगणना प्रशिक्षण शिबिराचा दुसरा टप्पा पूर्ण

schedule05 May 26 person by visibility 194 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : जनगणना 2027 करिता कोल्हापूर शहरासाठी एकूण 1206 ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 16 मे ते 14 जुन अखेर या कालावधीत घरगणना करण्यात येणार आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात एकुण 1,326 प्रगणक व 221 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या प्रशिक्षण शिबिराचा शेवटचा टप्पा म्हणजे दि.4 ते 7 मे 2026 या कालावधीत पार पडला. प्रशिक्षणाच्या प्रत्येक सत्राच्या शेवटच्या दिवशी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक आणि प्रगणक यांनी परिसरातील काही घरांमध्ये भेट देऊन जनगणना कामकाजाचे प्रात्यक्षिक घेतले.

आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना कामकाजासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना दि. 24 ते 27 एप्रिल 2026 या कालावधीत पहिले सत्र, दि.28 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत दुसरे सत्र, दि. 2 ते 4 मे 2026 या कालावधीत तिसरे सत्र व दि.5 ते 7 मे 2026 या कालावधीत चौथे सत्र अशा चार सत्रामध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेल्या एकुण 19 फिल्ड ट्रेनर यांच्यामार्फत  न्यु पॅलेस येथील छत्रपती शाहू विद्यालय व सानेगुरूजी वसाहतमधील वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल  या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

यावेळी शहर जनगणना अधिकारी तथा उपायुक्त परितोश कंकाळ, सहा.आयुक्त तथा चार्ज अधिकारी उज्वला शिंदे, स्वाती दूधाने, जयवंत जावडेकर, डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता तथा अति.चार्ज अधिकारी महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवार पोवार, जनगणना अधिक्षक सागर कांबळे, सामाजीक विशेषज्ञ युवराज जबडे, जनगणना समन्वयक विक्रमसिंह लाड, प्रकाश माने, धनंजय माने आदींसह सर्व टेक्निकल असिस्टंट व जनगणना विभागाकडील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

याचबरोबर जनगणेकरीता 1 ते 15 मे 2026 याकालावधीत नागरिकांना स्वयंगणना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी कोल्हापूर शहरातील नागरीकांनी https://se.census.gov.in या पोर्टलवर माहिती भरून स्वयंगणना करावी असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes