SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विभागीय कार्यालयांचे विकेंद्रीकरण; पुढील महिनाभरात सक्षम कामकाजाचे नियोजन करागोकुळच्या ११०० संस्थांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा; आमदार सतेज पाटील यांची आक्रमक भूमिकाकागल-गडहिंग्लज-उत्तूर मतदारसंघातील सर्वच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाहीथकबाकी असलेल्या गाळयांना 31 मे पर्यंत अंतीम मुदत, अन्यथा 1 जून पासून गाळे सील : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुडसमाजस्वास्थ्यासाठी वारकरी संप्रदायाचे योगदान अलौकिक : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनप्रगत भारताची गौरवगाथा: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसघुणकीत वंचितचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस 'स्वाभिमानी दिवस' उत्साहात साजराकोल्हापूर: उसाच्या शेतातून अडीच लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकागलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वूलू स्वच्छतागृह महिला भाविकांसाठी आधारवड, मातृ दिनाचे औचित्य साधून भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट : भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक

जाहिरात

 

थकबाकी असलेल्या गाळयांना 31 मे पर्यंत अंतीम मुदत, अन्यथा 1 जून पासून गाळे सील : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड

schedule11 May 26 person by visibility 103 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे थकबाकीदार गाळेधारकांनी येत्या दि.31 मे 2026 अखेर थकीत रक्कम भरावी, अन्यथा 1 जून 2026 पासून संबंधित गाळे सील करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाची आढावा बैठक आज दुपारी 12 वाजता आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी गाळेधारकांच्या थकबाकीचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या बहुतांश गाळेधारकांची मुदत सन 2015 मध्ये संपलेली आहे. शासन निर्णयानुसार महानगरपालिकेकडून 5 टक्के भाडेवाढ गृहीत धरून भाडे आकारणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ 20 ते 30 टक्के व्यावसायिकच नियमित भाडे भरत असून उर्वरित गाळेधारकांकडून थकबाकी वाढत आहे.

 महानगरपालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तर शहर विकासकामांवर परिणाम होतो. त्यामुळे सर्व थकबाकीदारांना 31 मे 2026 पर्यंत अंतिम संधी देण्यात यावी आणि त्यानंतर थकबाकीदार गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. ज्या गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे व ज्यांना कलम 81(ब) अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशा गाळ्यांचा तातडीने लिलाव प्रक्रियेद्वारे पुनर्वाटप करावे अशा सूचना दिल्या. तसेच खुल्या जागेची थकबाकी असलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महानगरपालिकेचे हॉल, भाजी मार्केट व पार्किंग व्यवस्था यांचे निविदा प्रक्रिया राबवून तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. याशिवाय हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे सध्याच्या स्थितीत लिलावाद्वारे एजन्सीला देण्याचा प्रस्ताव सादर करावा. 

यावेळी उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे व इस्टेट विभागीत लिपीक उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes