SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतार यांची निवडभविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावायश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहितीजप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलावशक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरु

जाहिरात

 

संजयबाबा घाटगेंनी स्वीकारले भाजपाचे प्राथमिक व सक्रिय सदस्यत्व; कार्यकर्त्यांसमवेत जिल्हा कार्यालयाला दिली भेट

schedule25 Apr 25 person by visibility 321 categoryराजकीय

कोल्हापूर :  गेल्या दहा वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेल्या देशाचा विकास गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या विविध विकासाच्या योजना आणि देशाच्या उद्धारासाठी केलेले काम यावर प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून पक्षाची शिस्त आणि संघटनेचा आदेश याचप्रमाणे इथून पुढच्या काळात कार्यरत राहील असे प्रतिपादन माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी केले .

भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आज संजय बाबा घाडगे व अमरीश सिंह घाडगे यांच्या समर्थकांसह पार्टीच्या कार्यालयात प्रथमच सदिच्छा भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते .

यावेळी  संजय बाबा घाडगे म्हणाले ,पक्ष संघटना पक्षशिस्त आणि पक्षाचे ध्येय धोरण या त्रिसूत्री वर आधारित पार्टीचे अनेक समर्पित कार्यकर्ते काम करताना आपण अनेक वर्ष पाहिलेले आहेत या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासमर्पित भावनेने काम करण्याच्या प्रवृत्तीनेच आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विजय सुकर झालेला आहे .

  पक्षाची कार्यपद्धती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चाललेली घोड दौड तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसचंद्रकांत दादा पाटील प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेले विकासात्मक निर्णय यामुळेच इथून पुढच्या भविष्यकाळात भारतीय जनता पार्टीचे देशाचा आणि राज्याचा विकास करू शकते हा विचार पटल्याने आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे .

  यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले संजय बाबा घाडगे व अमरीश सिंह घाडगे यांच्या भाजप प्रवेशाने कागल विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला बळ प्राप्त झालेले आहे त्यांच्या सोबत असलेले दूध संस्था आणि विकास संस्थांची जाळे सहकारी संस्थांतील त्यांचे काम जनसामान्यांच्या साठी राबवलेली पाणी योजना यामुळे कागल तालुक्यात विकासाची गंगा अवतरली असून त्यांचा आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी वाढण्या मध्ये मोलाचा वाटा राहील भारतीय जनता पार्टीमध्ये या जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी त्यांचे स्वागत करतो .

यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुरेशराव हळवणकर खासदार धनंजय महाडिक  जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे हस्ते श्री संजयबाबा घाटगे,  अमरीशसिंह घाटगे यांना भाजपाचे प्राथमिक सदस्य व सक्रिय सभासद झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी अशोक अण्णा चराटी,जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर, संग्रामसिंह कुपेकर महेश चौगुले अनिल देसाई महिला मोर्चाच्या अध्यक्षा  अनिता चौगुले,रणजीत सिंह मुडूकशिवाले,धनराज अनिल देसाई, किरणसिंह घाटगे, सुभाष जाधव, वसंत प्रभावळे, मेघाराणी जाधव ,मीनाक्षी नकाते , धनराज घाटगे, नाना कांबळे दत्तोपंत वालावलकर, अनिल शिवनगेकर दिग्विजय देसाई नामदेव चौगुले संतोष पाटील एकनाथ पाटील अमर पाटील सरदार सावंत सतीश पाटील विकास पाटील मंदार परितकर आदिंसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते .

प्रारंभी स्वागत जिल्हा सरचिटणीस आनंद गुरव यांनी केले प्रस्ताविक जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा यांनी केले तर आभार युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज करलकर यांनी मांडले.

 ▪️ पहेलगाम येथे दहशत वादी हल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना व भाजपाचे जिल्ह्याचे नेते बाबा देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes