SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीमेवरील जवानांसाठी करवीरकर भगिनींची ओवाळणी: 'एक राखी' ठरतेय बारा हत्तींचे नैतिक बळ!पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा : आमदार यड्रावकर ; पंचगंगा प्रदूषणासंदर्भात मुंबई मंत्रालयात बैठक संपन्न स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ, उचगावच्या सर्वागिण विकासासाठी १ कोटी रूपयांचा निधी देणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाहीआमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा : सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार राज्यात खळबळ! धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात 'एस.पी. गँग'वर कोल्हापुरात पहिलीच MCOCA कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपाताचा गोरखधंदा चालवणाऱ्या ११ जणांच्या मुसक्या आवळल्याडी. वाय. पाटील विद्यापीठाचा ‘टाटा स्किल्स’ सोबत सामंजस्य करारविभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसंजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन उत्साहात साजराएकल महिलांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरूकळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी मीना गौड यांची बिनविरोध निवड

जाहिरात

 

एकल महिलांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरू

schedule25 Aug 26 person by visibility 168 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या दि. 22 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी एकल महिला मसुदा समिती गठीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या संख्येसह आवश्यक माहिती संकलित करणे गरजेचे असल्याने नगर विकास विभागाने सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना आपल्या कार्यक्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण करून नोंदणी व अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील निरक्षर, अल्पशिक्षित, कष्टकरी व पात्र एकल महिला नोंदणी प्रक्रियेपासून वंचित राहू नयेत यासाठी महानगरपालिकेच्या वतीने अशा महिलांच्या नोंदणीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित व अविवाहित महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणाची जबाबदारी महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कर्मचारी शहरातील संबंधित महिलांची माहिती विहित नमुन्यातील अर्जाद्वारे संकलित करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.

तरी शहरातील नागरिकांनी आपल्या परिसरात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. पात्र एकल महिलांनी विहित नमुन्यातील फॉर्म भरून आवश्यक माहिती देत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes