SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
म्युझिकल फौंऊटेनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागरमातृत्वाची महानता: आईच्या अपार मायेचा उत्सवथलपति विजय यांच्या राजकीय पर्वाचा भव्य श्रीगणेशा; समर्थकांच्या जनसागरासमोर घेतली निष्ठेची शपथ!महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीनेजागतिक ल्युपस दिन: एक अदृश्य लढाई आणि जनजागृतीचा संकल्परायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावीविनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार : पणन मंत् जयकुमार रावलकागलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जल्लोषात स्वागतगोकुळ दूध संघाच्या कोल्हापूर आईस, गोकुळ मिल्क सप्लायर आणि गायत्री कोल्ड स्टोरेजच्या व्यवहारांची माहिती द्या......शिरोळमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य शिल्पाचे १३ मे रोजी ऐतिहासिक अनावरण

जाहिरात

 

रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी

schedule09 May 26 person by visibility 183 categoryराज्य

◼️महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिकांना मदत पोहोचविण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच सर्व संबंधित प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही धोका किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

या संकटाच्या काळात शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून सर्व यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे प्रशासनाने कळविले आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes