प्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट
schedule14 Mar 26 person by visibility 166 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक वसिफा समीर कोतवाल यांनी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे या विद्यापीठाकडून डॉक्टरेट (पीएचडी ) प्राप्त केली आहे.
"एआय अँड आयओटी बेस्ड इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग अँड डिस्ट्रीब्यूशन " या विषयावर त्यांनी संशोधन करून शोधप्रबंध सादर केला. हे संशोधन त्यांनी प्रा. डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले.
डॉ. वसिफा कोतवाल यांच्या संशोधनामध्ये रिअल-टाइम आयओटी आधारित सेन्सिंग आणि एआयच्या साहाय्याने पाण्याच्या गुणवत्तेचे, प्रवाहाचे व दाबाचे त्वरित निरीक्षण करणे, प्रभागनिहाय अचूक पाणी मागणीचा अंदाज व नियोजन करणे, योग्य पाणी पुरवठासाठी सुलभ व वापरकर्ता-अनुकूल डॅशबोर्ड विकसित करणे या प्रणालीचा समावेश आहे.
यासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्र - कुलपती ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत ,डॉ.जयदीप पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके,डॉ.समीर कोतवाल यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले.