SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीकाजीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूरडीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी

जाहिरात

 

कोल्हापुरात अंबाबाई देवस्थान परिसर विकासासाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरु...

schedule05 May 26 person by visibility 160 categoryराज्य

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी/अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यांतर्गत प्राथमिक सर्वेक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण तीन पथकांमार्फत राबविण्यात येत असून प्रत्येक पथकात कोल्हापूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

प्रत्येक पथकात एक ग्राम महसूल अधिकारी, एक परिरक्षण भूमापक तसेच घरफाळा विभागाचे दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये एकूण 137  सिटी सर्व्हे क्रमांक समाविष्ट आहेत. त्यापैकी आजच्या पहिल्याच दिवशी 35 सिटी सर्व्हे क्रमांकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 7 सिटी सर्व्हे क्रमांकांचे काम अंशतः पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण प्रक्रियेला मिळकतधारकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी मालकांऐवजी कुळ वास्तव्यास असल्याने संबंधित मिळकतधारकांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे.

या सर्वेक्षणातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारेच महालक्ष्मी/ अंबाबाई देवस्थान परिसर विकासाच्या पुढील टप्प्यांची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मिळकतधारकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes