SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतार यांची निवडभविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावायश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहितीजप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलावशक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरु

जाहिरात

 

राष्ट्रीय डेंग्यू दिन

schedule16 May 23 person by visibility 587 categoryसंपादकीय

दरवर्षी भारतात १६ मे हा दिन “राष्ट्रीय डेंग्यू दिन" म्हणून ओळखला जातो. डेंग्यूबद्दल अधिकाधिक जनजागृती होण्यासाठी हा दिवस पाळला जातो. हा डेंग्यू विषाणू (अर्को विषाणू) मुळे होतो. या रोगाचा एडिस एजिप्ती नावाच्या डासांमार्फत प्रसार होतो. रोगाचे दोन प्रकार आहेत. रक्तस्त्राव नसणारा व रक्तस्त्राव असणारा डेंग्यू. डेंग्यू रोगाचा अधिशयन कालावधी ५ ते ७ दिवस आहे. या आजाराचे रोग निदान पुढील बाबीवरुन करता येते.

 लक्षणे व चिन्हे, रक्तातील जंतूची प्रयोगशाळेत तपासणी करुन व रक्तातील जंतूची प्रयोगशाळेत वाढ करुन डेंग्यू आजाराचे नियंत्रण- 

 एडिस डासांची उत्पत्ती स्थानके नष्ट करणे, उदा- कुलर, माठ, रिकामे डबे, नारळांच्या करवंट्या, भंगार साहित्य, फ्रिज, घराभोवती पाणी साठणारे लहान मोठे खड्डे बुजवावेत. प्रत्येक आठवड्याला घरातील सर्व पाणी वापराची भांडी रिकामी करुन घासून पुसून कोरडी करुन पुन्हा भरावीत. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. सायंकाळच्या वेळी घराच्या खिडक्या, दारे बंद करावीत,डासांना पळवून लावणा-या अगरबत्तीचा वापर करावा, जास्तीत जास्त लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करावी.

कोरोना इतकाच भयानक कोणता रोग असेल तर तो आहे डेंग्यू! कारण डेंग्यू सरळ रोगप्रतिकारक शक्तीवर आघात करतो आणि त्यामुळे माणसाच्या शरीरातील पांढ-या पेशींचा -हास होतो. आपल्या पिढीने पाहिलेला सगळ्यात भयानक आजार कोणता तर साहजिकच सगळ्यांचं उत्तर असेल करोना! पण मंडळी हे खरं नाही. करोना जरी भयानक आजार वाटत असला तरी तो सगळ्यात भयानक आजार नाही. या आजारापेक्षाही कित्येक जीवघेणे आजार आजवर या जगात धुमाकूळ घालून गेले आहेत आणि काही आजार अजूनही मृत्यूचे थैमान घालत आहे. असाच एक आजार आहे डेंग्यू. या आजाराबद्दल तुम्हालाही माहित असेलच.

हा आजार पावसाळ्यात आपले डोके वर काढतो. हा आजार इतका भयानक आहे की परिस्थिती हाताबाहेर गेली तर कोरोनासारखा थैमान घालू शकतो, म्हणून दर पावसाळ्यात प्रशासन डेंग्यूच्या मच्छरांना नष्ट करण्यासाठी औषध फवारणी अभियान चालवते आणि नागरिकांना सुद्धा काय काय सुरक्षा, उपाययोजना पाळाव्यात त्याची माहिती देते. यामुळे हा आजार नियंत्रणात आहे. असे असूनही दरवर्षी करोडो लोक या आजाराला बळी पडतात हे देखील कटू सत्य आहे. आज आपण राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या निमित्ताने या आजाराबद्दल जाणून घेऊया. कधी जन्माला येतात डेंग्यूचे डास?

डेंग्यूचे डास हे सामान्यतः पावसाळ्याच्या काळात विळखा घालायला सुरुवात करतात. जुलै ते ऑक्टोबर या काळात पावसाचा प्रभाव जास्त असल्याने या काळात यांचा त्रास अधिक वाढतो. जिथे जिथे पावसाच्या पाण्याचे डबके साचते ती जागा या मच्छरांचे घर असते. म्हणून उन्हाळा संपता संपता सरकार तर्फे लोकांच्या घरात, आवारात फवारणी मारायला सुरुवात केली जाते. सरकार या आजाराबद्दल इतके सतर्क असते यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की हा आजार किती भयानक आणि जीवघेणा असू शकतो.

पावसाळा संपत आला तरी देशात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येते. या कोरोना कालावधीत डेंग्यूने इतक भयंकर रूप धारण केलं आहे की लोकांना रुग्णालयात दाखल व्हावं लागत आहेत. ताप, थंडी वाजून येणे, सांधे व स्नायूदुखी आणि शरीरावर रॅशेस येणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे मानली जातात. हा आजार इतका धोकादायक नसला तरी उपचार मिळण्यास उशीर झाल्यास ही स्थिती गंभीर रुप धारण करु शकते. या गंभीर स्थितीस डेंग्यू हेमोरेजिक फिव्हर (DHF) असे म्हणतात. 

🔸️डेंग्यू हेमोरेजिक फिव्हर नेमकं काय आहे?
जेव्हा मच्छर डेंग्यूच्या व्हायरसने संक्रमित होतात तेव्हा ते संक्रमित रक्ताने इतरांना चावतात. दुसऱ्या व्यक्तीला असे डास चावल्याने हा व्हायरस पसरतो. यामुळे हॅमरेजिक फीवरच्या विळख्यात सापडतो. डेंग्यूचा प्रसार चार डेंग्यूच्या विषाणूंपैकी एका मादी एडिस डासाच्या चावण्यामुळे होतो. जेव्हा मादी एडिस डास चावतो तेव्हा डेंग्यूचा विषाणू आपल्या शरीरातील रक्तात शिरतो आणि आपल्या शरीरावर परिणाम करु लागतो. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५ ते ६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो (सरासरी ३ ते १४ दिवस) याची लक्षणं. रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती डेंग्यूने संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात येते तेव्हा देखील होऊ शकते. 

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा डासांना डेंग्यूच्या विषाणूची लागण होते, तेव्हा ते त्याच संक्रमित रक्तानेच लोकांना चावतात आणि अशा पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीकडे हा आजार डासाच्या चावण्यामुळे पसरतो. डेंग्यू तापाची बहुतेक प्रकरणे तेव्हाच दिसून येतात जेव्हा एखाद्याला संक्रमित डास चावतो. पण मच्छर व्यतिरिक्त संक्रमित व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात आल्यानेही लोक डेंग्यूला बळी पडू शकतात. अर्थात काय तर हा प्रसार आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू 'एडीस इजिप्ती जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केलं जातं. एकदा तुम्हाला एका प्रकारच्या व्हायरसची लागण झाली तर तुमचे शरीर आयुष्यभर या प्रकारच्या व्हायरलसोबत लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती विकसित करते. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला इतर प्रकारच्या व्हायरसपासून देखील संरक्षण मिळेल. एखादी व्यक्ती कोणत्याही वेळी एकदा होऊन गेलेल्या प्रकारातील व्हायरस सोडून इतर सर्व प्रकारच्या डेंग्यू विषाणूंच्या संपर्कात कधीही येऊ शकते, म्हणून लवकरात लवकर रोग निदान करुन वेळेत औषधोपचार सुरु होंणे आवश्यक असते.

रोग निदान पुढील बाबीवरुन करता येते.
लक्षणे व चिन्हे, रक्तातील जंतूंची प्रयोगशाळेत वाढ करणे, रक्ताची तपासणी करणे. डेंग्यू आजारावर उपचार, रुग्णांस सपूर्ण विश्रांती द्यावी. तापावर पॅरासिटेमॉल वेदनाशामक औषधे द्यावीत, आवश्यक असल्यास शिरेतून द्रव द्यावे, रक्तस्त्राव होत असल्यास संदर्भ सेवा देण्यात यावी.
    
                                              
✍ प्राचार्य 
आरोग्य व कुटूंब कल्याण 
नियोजन प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes