जोतिबा डोंगरावर घडलेल्या खुनाच्या गुन्हयाचा उलगडा; 2 आरोपींना कर्नाटकमधून अटक
schedule21 Apr 25 person by visibility 469 categoryगुन्हे

कोल्हापूर : जोतिबा डोंगरावर घडलेल्या खुनाच्या गुन्हयाचा उलगडा झाला असून याप्रकरणी २ आरोपी यांना कर्नाटकमधुन घेतले ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने ही कारवाई केली.
दि.१९.०४.२०२५ रोजी अंदाजे ४५ ते ५० वयाचे पुरुष जातीचे अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी मारहाण करुन दोरीने गळा आवळुन तसेच मयत इसमाचे हात पाय बांधुन त्याचा खुन करुन त्याचे प्रेत गिरोली ते जोतिबा मंदीर जाणारे रोडवरील यमाई मंदीराचे पायथ्याजवळील डोंगरावर टाकून दिले होते. त्याबाबत तात्काळ कोडोली पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाचे विरुध्द खुनाचा गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.
मयत इसमाची ओळख पटविणेबाबत कोणताही पुरावा नसताना त्याची प्रथम ओळख पटविणे आवश्यक होते. याशिवाय घटनास्थळावर कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तू मिळून आलेली नव्हती. त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांसमोरील आव्हानात्मक काम होते.
स्थानिक गुन्हे शाखेची मिसींग व्यक्तीचा शोध घेणेसाठी ०३ पथके व सी सी टी व्ही फुटेज व तांत्रीक माहिती घेण्यासाठी ०३ पथके तयार केली. मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या पथकाने कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व कर्नाटक राज्य या ठिकाणी ४० ते ५० वयाच्या कोणत्या व्यक्ती मिसिंग आहेत का? याबाबत शोध घेण्याचे काम सुरू केले तसेच उर्वरीत ०३ पथके हे गोपणीय माहिती व तांत्रीक तपास करीत होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, सुरेश पाटील, रोहीत मर्दाने, राजु कांबळे, रुपेश माने यांचे पथकाने कोल्हापूर जिल्हयातील १२० ते १३० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता सदर गुन्हयातील अनोळखी प्रेत हे एका ओमणी गाडीतुन जोतिबा डोंगरावर आणलेचे निष्पन्न केले. सदर ओमणी गाडीचा सीसीटीव्हींद्वारे शोध घेत असताना पथकास जयसिंगपुर येथे ओमणी गाडीचा क्रमांक प्राप्त झाला. सदरची ओमणी कार ही राजू हुलागटी, अथणी, बेळगांव याच्या मालकीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ अथणी बेळगांव या ठिकाणी रवाना होवून त्यांनी ओमनी कारचे मालक राजु भिमाप्पा हुलागटी वय ४१ रा. देसाईवाडी ता अथणी जि बेळगाव यास ओमनी कार क्र KA-22-M-6356 सह ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने मयत इसमाचे नाव आप्पासो शंकर बोरगावे वय ४५ रा मोळे ता कागवाड जि बेळगाव असे सांगुन मयताचा भाऊ नामे महावीर बोरगावे हा ०८ वर्षापुर्वी मयत झाला होता, भावाच्या मृत्यूपश्चात भावाची पत्नी (भावजय) हिचेशी मयताचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते. नजीकच्या काळात मयताची भावजय व गुन्हयातील मुख्य आरोपी नामे गौडप्पा शिंदे या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्या कारणावरुन मयत हा भावाच्या पत्नीस मारहाण करून शिवीगाळ करीत होता. त्यामुळे मयताची भावजय हिने गौडप्पा शिंदे यास फोन करुन आप्पा बोरगावे यास संपवावे असे सांगितले वरुन गुन्हयातील मुख्य आरोपी गाँडाप्पा शिंदे याने ताब्यात घेतलेल्या आरोपीशी संगणमत करुन मयत आप्पाजी बोरगावे यास दिनांक १८/०४/२०२५ रोजी रात्री उगार कर्नाटक येथील हॉटेलवर दारु पाजली. त्यानंतर मयत आप्पाजी यास त्याचे ओमनी कारमधून दि. १९/०४/२०२५ रोजी पहाटे २.०० वा चे सुमारास जोतिबा ते गिरोली जाणारे रोडवरील यमाई मंदीराचे पायथ्याजवळील डोंगरावर हात पाय बांधून आणले. तसेच त्या ठिकाणी त्याचा गळा आवळुन खुन केल्याची माहिती दिली. त्यानंतर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे गौडप्पा आनंद शिंदे वय ३३ रा कात्राळ ता कागवाड जि बेळगाव राज्य कर्नाटक यास त्याचे राहते घर परिसरामधून ताब्यात घेतले.
त्याने देखील गुन्हा केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना गुन्हयात वापरलेल्या चारचाकी ओमनी कार क्रमाक KA-22-M-6356 सह ताब्यात घेवुन गुन्ह्याचे पुढील तपासकामी कोडोली पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक , महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी धीरज कुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभाग आप्पासो पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, सुरेश पाटील, रोहीत मर्दाने, राजु कांबळे, रुपेश माने, राम कोळी, वसंत पिंगळे, सतिश जंगम, बालाजी पाटील, कृष्णात पिंगळे, प्रशांत कांबळे, अरविंद पाटील, अमित सर्जे, हंबीर अतिग्रे यांनी केलेली आहे.