SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवडवनकायदे, जैवविविधता व ड्रोन प्रशिक्षणावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात कोल्हापुरात उद्यापासून रमजान पर्वाला प्रारंभ; आज रात्री पहिली 'तरावीह'डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावकेआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथनछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार; शासनाकडून निधी मंजुरराज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशनआयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पनाकोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियानमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

जाहिरात

 

डीकेटीई आणि एमकेसीएल यांच्यात सामंजस्य करार संपन्न

schedule17 Feb 26 person by visibility 208 categoryशैक्षणिक

  🔹️डीकेटीईच्या विद्यार्थ्यांसाठी २६० हून अधिक डिजिटल कौशल्य अभ्यासक्रमांची संधी

  इचलकरंजी : येथील डीकेटीई संस्थेने राज्यातील अग्रगण्य डिजिटल शिक्षण व कौशल्य विकास करणाऱ्या महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि. पुणे (एमकेसीएल) यांच्याशी शैक्षणिक सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. विद्यार्थ्यांचे नवनवीन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान संगणकाच्या साहाय्याने आत्मसात करण्याच्या उद्देशाने या कराराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या करारामुळे डीकेटीईमधील तसेच इतर इच्छुक विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि नवोपक्रम यांचा संगम साधणारे व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार असून, यामुळे स्कील इन्हॅन्समेंट (Skill Enhancement), ट्रेनिंग, इंटरनशिप आणि प्लेसमेंटसाठी मदत होणार आहे.

  सध्याच्या बदलत्या काळात पारंपारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तांत्रिक कौशल्य प्रशिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच हा करार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पुणे स्थित एमकेसीएल ही संगणक तंत्रज्ञानाधारित शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी संस्था असून, या करारामुळे डीकेटीईच्या व इतर विद्यार्थ्यांना २६० हून अधिक मूलभूत तसेच प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

  यामुळे उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांच्या माहितीचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. तसेच एआय (AI), सायबर सिक्युरीटी, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सायन्स, रिटेल बिझनेस डायनॅमिक्स, बेसिक्स ऑफ डिझाईन, ऑटोमॅटिक अ‍ॅटोकॅड (AutoCAD), तसेच विविध रोजगाराभिमुख कौशल्ये यांसारख्या क्षेत्रांतील अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-अभ्यासाची सवय, डिजिटल सक्षमता आणि आत्मविश्वास वाढीस लागणार असून, भविष्यातील उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार त्यांना सक्षम बनविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या करारासाठी अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्तांचे मार्गदर्शन मिळाले. करार हस्तांतरण प्रसंगी डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे, डायरेक्टर डॉ. एल. एस. आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ. यु. जे. पाटील, एमकेसीएलचे अमित रानडे, अनिल गावंडे, डीकेटीई डिप्लोमा विभागप्रमुख आर. के. वळसंग, शबाना बैरागदार, एस. ए. शेटी, पी. एस. कुलकर्णी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes