‘गोकुळ’ मध्ये महाराष्ट्र दिन; कामगार दिन साजरा; रक्तदान शिबीर उत्साहात
schedule01 May 25 person by visibility 312 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना कॉम्रेड उमेश सूर्यवंशी म्हणाले कि, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत व मुंबई शहराच्या जडण-घडणीमध्ये कामगारांनी अतुलनिय योगदान दिले आहे. गोकुळ दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपली असून या सगळ्याचे श्रेय गोकुळ दूध संघाशी संलग्न असणारे दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, वाहतूकदार व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोकुळचा कर्मचारी वर्गाचे आहे. कामगारांनी त्यांचे कर्तव्य प्रामणिकपणे पार पाडून संस्था वाढीसाठी प्रयन्न करावे असे मत युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ. उमेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांच्या हस्ते युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉ.संदेश पाटील यांनी केले तर आभार कॉ. शाहीर सदाशिव निकम यांनी मानले.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (खरेदी) मोळक, विभाग प्रमुख (स्टोअर) सुनिल कारंडे, संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. सदाशिव निकम, अध्यक्ष कॉ. मल्हार पाटील, कॉ.व्ही.डी.पाटील, कॉ.लक्ष्मण पाटील, कॉ. अशोक पुणेकर, कॉ.दत्ता बच्चे, कॉ.संदेश पाटील, कॉ.संभाजी शेलार, कॉ.लक्ष्मण आढाव, कॉ.योगेश चौगुले, कॉ. कृष्णा चौगुले व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.
▪️‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्य रक्तदान शिबीर उत्साहात
कोल्हापूर : १ मे २०२५ जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटना, आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने महालक्ष्मी ब्लड बँक, कागल व कोल्हापूर व वैभवलक्ष्मी ब्लड बँक, कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे आयोजित केले होते. या शिबीरामध्ये ७८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, रक्तदान हि एक जनसेवाच आहे. रक्तदानामुळे अनेक लोकांना जीवदान मिळू शकते. “ रक्तदान हेच श्रेष्ठदान ” या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल गोकुळ कर्मचारी संघटनेचे कौतुक केले. यावेळी सर्व रक्तदात्यांना रेनसूट संघटनेकडून देण्यात आले. यावेळी आयटक कामगार संलग्न गोकुळ कर्मचारी, मार्व्हलस कंपनी, टूलेक्स कंपनी, कृषी संघ, लक्ष्मी लाडा कंपनीचे तसेच एम.आय.डी.सी. तील कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम, अध्यक्ष कॉ.मल्हार पाटील, कॉ. व्ही.डी.पाटील, कॉ.लक्ष्मण पाटील, कॉ.दत्ता बच्चे, कॉ.संभाजी शेलार, कॉ.संदेश पाटील, कॉ.लक्ष्मण आढाव, कॉ.योगेश चौगुले, कॉ.कृष्णा चौगुले व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.
