SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विनायक भोसले यांचा 'लायन्स गौरव' पुरस्काराने सन्मान गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीकाजीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

जाहिरात

 

आमदार सतेज पाटील स्वतः SIR मोहिमेसाठी घरोघरी; एसआयआर साठी जनजागृती करणारे राज्यातील पहिले लोकप्रतिनिधी

schedule03 May 26 person by visibility 308 categoryराज्य

कोल्हापूर  : निवडणूक आयोगाच्या विशेष पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जनतेसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रीय सहभागाचे प्रतिपादन केले आहे. मतदार यादी अचूक राहण्यासाठी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

कसबा बावडा परिसरातील यशवंत कॉलनी, अजिंक्यतारा कॉलनी, मातंग वसाहत व पंचरत्न कॉलनी येथे त्यांनी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) सोबत घरोघरी भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, अशा मतदारांशी संवाद साधत माहिती पडताळणी केली.
SIR मोहिमेत मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, डुप्लिकेट नावे वगळणे आणि नव्या मतदारांची नोंद करणे यावर भर दिला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ३३,६७,६५९ मतदारांपैकी सुमारे २४,५२,४१७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित सुमारे २७ टक्के मतदारांचे मॅपिंग बाकी आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून QR कोड व मिस्ड कॉल सुविधेद्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आमदार सतेज पाटील हे स्वतः घरोघरी जाऊन मॅपिंग नसलेल्या मतदारांची पडताळणी करत आहेत.

SIR मोहिमेबाबत काही आक्षेप असले तरी प्रक्रिया सुरू असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी दक्ष राहून आपल्या बूथमधील मतदारांचे मॅपिंग पूर्ण करावे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

राज्यातील लोकप्रतिनिधींमध्ये स्वतः घरोघरी जाऊन SIR मोहिम राबविणारे ते पहिले लोकप्रतिनिधी ठरत असून, मतदार जनजागृतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी BLO कडे आवश्यक कागदपत्रे सादर करून आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा आणि या मोहिमेकडे दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद स्तरावरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही SIR मोहिमेत सक्रिय सहभाग सुरू केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes