भारतीय सशस्त्र दलांचा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक
schedule07 May 25 person by visibility 284 categoryदेश

नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील एकूण नऊ महत्त्वाच्या दहशतवादी तळ्यांवरती अचूक लक्षवेधी कारवाई करत पहेलगाम दहशतवादी हल्ल्यास मात्र संयमी प्रतिउत्तर देत पिडीतांना न्याय दिला आहे.
ज्या दहशतवादी तळ्यांवरून भारतामध्ये पहेलगाम आणि या आधीचे हल्ले करण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आली आणि योजना आखण्यात आल्या त्यात तळांवरच सर्जिकल स्ट्राइक करत भारताने दहशतवाद विरोधातली लढाई आणखीनच तीव्र केली मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान २५ मिनिटांमध्ये हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. बहावलपूर, मुरीदके, तेहरा कला,ह सियालकोट, बरनाला, कोटली आणि मुजफ्फराबाद मधल्या दहशतवादी तळावर ही कारवाई करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या कारवाई वरती रात्रभर लक्ष ठेवून होते पहेलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमी वरती ही पावलं उचलण्यात आली. या हल्ल्यांमध्ये 26 जणांची हत्या करण्यात आली होती भारताने आज नऊ दहशतवादी तळून उध्वस्त केले या कारवाई द्वारे भारताने दहशतवाद विरोधातल्या लढ्याचा आपला निश्चय अधिकच दृढ केला आहे भारताने ऑपरेशन शेंदूर च्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीने आणि चूक प्रत्युत्तर दिला आहे असं परराष्ट्र सचिव यांनी सांगितलं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार बैठकीत या विषयी माहिती दिली पाकिस्तानला अनेकदा सांगूनही पाकिस्तानने यावर कोणतीही कारवाई केली नाही असं ते म्हणाले पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवस उलटूनही पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात काही कारवाई केली नाही उलट आमच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारता विरोधात आणखी आले होण्याची शक्यता होती हे लक्षात घेऊन हल्ल्याला प्रत्युत्तर आणि आत्मसंरक्षणाच्या दोन्ही हेतूने भारताने या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार वापरात एक कारवाई केल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती यांना या कारवाईबाबत माहिती दिली. त्याआधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विविध राज्यांचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांची ऑनलाईन बैठकीमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. देशाच्या सीमा वरती राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले नागरिकांची सुरक्षा ही सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे यावरही त्यांनी भर दिला रजेवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचा आदेश गृहमंत्र्यांनी निमलष्करी दलाच्या प्रमुखांना दिला आहे .ऑपरेशन शेंदूरच्या पार्श्वभूमी वरती उद्या एक सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री के जयशंकर यांनी आज फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन आणि कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत भारताच्या लष्करी कारवाईची माहिती दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही विविध देशांच्या सुरक्षा सल्लागारांना या कारवाईची माहिती दिली. भारत-पाक दरम्यानचा तणाव वाढवण्याची भारताची इच्छा नाही मात्र पाकिस्तानने कुरापती केली तर भारतर उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. असेही डोवाल यांनी सर्व देशांच्या सुरक्षा सल्लागारांना सांगितले. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी सदस्य देशांच्या राजदूतानाही या कारवाईची माहिती दिली. यामध्ये चीनचे राजदूत यांचाही समावेश आहे.