SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवडवनकायदे, जैवविविधता व ड्रोन प्रशिक्षणावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात कोल्हापुरात उद्यापासून रमजान पर्वाला प्रारंभ; आज रात्री पहिली 'तरावीह'डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावकेआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथनछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार; शासनाकडून निधी मंजुरराज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशनआयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पनाकोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियानमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

जाहिरात

 

कोल्हापुरात घरगुती वादातून पत्नीची हत्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पतीला ८ तासांत ठोकल्या बेड्या

schedule17 Feb 26 person by visibility 297 categoryगुन्हे

कोल्हापूर: घरगुती वादातून पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या ८ तासांत अटक केली आहे. गणेश शंकर हुबाळे (वय ४०, रा. शनिवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपी गणेश हुबाळे याचे पत्नी स्वाती हुबाळे हिच्यासोबत घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात गणेशने स्वातीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला खाजगी रुग्णालयात दाखल करून आरोपी पसार झाला होता. मात्र, उपचारादरम्यान १७ फेब्रुवारी रोजी स्वातीचा मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा (BNS १०३(१)) दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी समांतर तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर वाघ व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे, सीपीआर रुग्णालयाजवळील बासुरी हॉटेलच्या पाठीमागे सापळा रचून गणेश हुबाळेला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने सततच्या वादातून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई एलसीबी आणि लक्ष्मीपुरी पोलीस पथकाने संयुक्तपणे यशस्वी केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes