SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विनायक भोसले यांचा 'लायन्स गौरव' पुरस्काराने सन्मान गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीकाजीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

जाहिरात

 

“जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या पर्यटन सामर्थ्याची ठळक नोंद” : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

schedule03 May 26 person by visibility 253 categoryराज्य

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याच्या पर्यटन क्षमतेला जागतिक व्यासपीठावर ठळकपणे मांडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून अमेरिकेतील न्यू यॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर येथे महाराष्ट्र पर्यटन विभागाची माहितीपर जाहिरात झळकली आहे.

महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे   आणि सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या पर्यटन क्षेत्राचा जागतिक स्तरावर प्रभाव वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

जगातील सर्वाधिक गजबजलेल्या आणि प्रभावी व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या या ठिकाणी दररोज लाखो पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे अशा प्रतिष्ठित जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राची उपस्थिती नोंदविणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या उपक्रमाबाबत माहिती देताना देसाई म्हणाले की, महाराष्ट्राची पर्यटन क्षमता जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. टाइम्स स्क्वेअर सारख्या जागतिक प्रतिष्ठेच्या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटनाची जाहिरात झळकणे म्हणजे आपल्या राज्याच्या पर्यटन सामर्थ्याची जागतिक पातळीवर ठळक नोंद आहे. यामुळे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीला गती मिळेल.

महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक किल्ले, निसर्गसंपन्न पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे आणि आधुनिक शहरी पर्यटन यांची प्रभावी मांडणी या जाहिरातीद्वारे करण्यात आली आहे. टाइम्स स्क्वेअर हे जागतिक स्तरावर पर्यटन, मनोरंजन, व्यापार आणि डिजिटल जाहिरातींचे प्रमुख केंद्र असल्याने येथे झळकणाऱ्या जाहिरातींना जगभरातून मोठे लक्ष मिळते. परिणामी, महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रसिद्धी मिळण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्रातील विविधतेने नटलेली पर्यटन स्थळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरत असून, अशा जागतिक पातळीवरील उपक्रमांमुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विभागाचा हा उपक्रम *‘अद्वितीय महाराष्ट्र’* या ब्रँडची जागतिक पातळीवर दृढ ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल ठरत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes