SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विभागीय क्रीडा संकुलाच्या १९५ कोटींच्या सुधारित आराखड्यास विभागीय समितीची मंजुरीकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसंजय घोडावत ग्रुप व वारणा उद्योग समूह यांच्या संयुक्त उपक्रमातून पहिल्या विमान प्रवासाची स्वप्नपूर्तीकामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकरजेव्हा पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा ...२ मार्चपासून सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होणारविशेष संख्याशास्त्रीय सादरीकरणात कवठेमहांकाळचे महाविद्यालय प्रथममुंबईचे महापौर, उपमहापौर, पदाधिकारी सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटनसाहित्य, समाज, वास्तवाशी जोडलेले चित्रपट हे प्रभावी माध्यम : डॉ. डेल्फिम द सिल्वा; शिवाजी विद्यापीठात ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

जाहिरात

 

भाजपा जिल्हा कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन

schedule11 Feb 26 person by visibility 138 categoryसामाजिक

कोल्हापूर : भाजपा जिल्हा कार्यालयात आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ११० व्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

याप्रसंगी बोलताना कोल्हापूर जिल्हा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, अखिल भारतीय जनसंघ या राष्ट्रीय राजकीय पक्षाचे अध्यक्ष असताना सुद्धा टोकाच्या साध्या पद्धतीने राहणाऱ्या दीनदयाळजींना पंडित ही पदवी लोकांनी स्वतः हून प्रदान केली. ते शरीराने आपल्याला सोडून गेले, तरी आजही पंडित दीनदयाळ उपाध्याय, त्यांच्या कार्याने, विचारांनी आणि एकात्म मानव दर्शन या तत्त्वज्ञानाच्या रूपाने प्रभावीपणे जिवंत आहेत.

 गेल्या दशकात त्यांचे एकात्म मानव दर्शन, 'राष्ट्र जीवनाची दिशा' या पुस्तकातील विचार, त्यांनी मांडलेली अंत्योदयाची संकल्पना यावर विचारवंतांमध्ये मोठे विचार मंथन सुरू आहे. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अंत्योदयासाठी म्हणजेच अंतिम व्यक्तीच्या प्रगतीसाठी 'हर हाथ को काम हर खेत को पानी' आवश्यक असल्याचे दीनदयाळजींनी वारंवार सांगितले होते. त्यामुळेच रोजगार मेळावे, विविध कृषी विकास योजना यांना वर्तमान सरकारने दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव दिले आहे. त्यामुळे भाजपा पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजकार्य करणे आवश्यक आहे. समाजातील सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी दीनदयाळजींच्या विचारांवर अधिक जोमाने काम केल्यास देशात प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याच्या दृष्टीने सार्थक प्रगती होईल असे मत व्यक्त केले. 

याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, गटनेते मुरलीधर जाधव, प्र.का.सदस्य राहुल चिकोडे, सरचिटणीस विराज चिखलीकर, धनश्री तोडकर, हेमंत आराध्ये, अशोक देसाई यांच्यासह नूतन नगरसेवक, नगरसेविका व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes