आत्मा योजनेंतर्गत गुडाळ येथे शनिवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन
schedule22 May 25 person by visibility 183 categoryराज्य

कोल्हापूर : आत्मा योजनेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन 2025-26 गावपातळीवर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता गुडाळेश्वर मल्टिपर्पज हॉल, गुडाळ, ता. राधानगरी येथे होणार आहे.
हा कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता सेंद्रीय शेती विषयाचे तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. प्रशिक्षणाच्या ठिकाणी आत्मा योजनेंतर्गत सेंद्रीय शेती प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आलेले असून कार्यक्रमाकरीता जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी व शेतकरी गटांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक, रक्षा शिंदे यांनी केले आहे.