माजी सैनिक व अवलंबितांनी आपला डाटा 10 जून पर्यंत अद्ययावत करावा
schedule23 May 25 person by visibility 144 category

कोल्हापूर : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या आदेशान्वये कोल्हापूर जिल्ह्यातील आजमितीस एकूण माजी सैनिक संख्या 20 हजार 531 पैकी 8 हजार 394 माजी सैनिक व अवलंबित यांनी आपले ऑनलाईन डाटा पंजीकरण केले आहे. उर्वरित 12 हजार 137 माजी सैनिक व अवलंबितांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दिनांक 10 जून 2025 पर्यंत आपला ऑनलाईन डाटा पंजीकरण, अद्यावत करणे अनिवार्य आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून मिळणा-या यापुढील सर्व अर्थिक मदती या महाडिबीटी (MAHA DBT) च्या धर्तीवर डायरेक्ट खात्यावर वर्ग केल्या जातील. यासाठी सर्वांनी वरील वेबसाईटवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. यापूर्वी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनी परत रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तसेच पंजीकरण नंतर जनरेट (generate) केलेला फॉर्म या कार्यालयात लवकरात लवकर जमा करावा,
असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.