SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विभागीय क्रीडा संकुलाच्या १९५ कोटींच्या सुधारित आराखड्यास विभागीय समितीची मंजुरीकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसंजय घोडावत ग्रुप व वारणा उद्योग समूह यांच्या संयुक्त उपक्रमातून पहिल्या विमान प्रवासाची स्वप्नपूर्तीकामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकरजेव्हा पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा ...२ मार्चपासून सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होणारविशेष संख्याशास्त्रीय सादरीकरणात कवठेमहांकाळचे महाविद्यालय प्रथममुंबईचे महापौर, उपमहापौर, पदाधिकारी सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटनसाहित्य, समाज, वास्तवाशी जोडलेले चित्रपट हे प्रभावी माध्यम : डॉ. डेल्फिम द सिल्वा; शिवाजी विद्यापीठात ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

जाहिरात

 

नोकरी शोधणारे नव्हे, रोजगारनिर्माते बना : सुरेश उमाप; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता जनजागृती कार्यक्रम

schedule11 Feb 26 person by visibility 139 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : आजच्या बदलत्या उद्योगविश्वात युवकांनी नोकरी शोधणारे न होता, रोजगारनिर्माते बनण्याची मानसिकता जोपासली पाहिजे. नवोपक्रम, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ही यशस्वी स्टार्टअपची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष तसेच एमसीईडीचे माजी प्रादेशिक अधिकारी  सुरेश बी. उमाप यांनी केले. डी. वाय. पाटील आभियात्रिकी (स्वायत्त महाविद्यालय) येथे यांत्रिक विभागामार्फत आयोजित उद्योजकता जनजागृती कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली तसेच विद्युत मापन उपकरण डिजाइन संस्थान (आयडीईएमआय) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आय- कनेक्ट (उद्योग–संस्था संवाद मालिका) अंतर्गत  उद्योजकता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्योगक्षेत्रातील बदल, शासकीय योजना, एमएसएमईमार्फत उपलब्ध सुविधा आणि स्टार्टअप सुरू करताना आवश्यक असलेली मानसिक तयारी याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या चौकटीबाहेर विचार करून नव्या संधींचा शोध घ्यावा, असे आवाहनही उमाप यांनी केले.

यांत्रिक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. जे. रायकर म्हणाले,  स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविण्यावर समाधान न मानता उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे.  उद्योग–शैक्षणिक संवाद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या माध्यमातून चांगले उद्योजक घडवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. 

संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिल (IIC) व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रा. विराज पासरे, प्रा. उत्कर्ष पाटील व प्रा. योगेश चौगुले यांनी नियोजन व समन्वयन केले. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक  डॉ. ए. के. गुप्ता,  प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes