SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यतामाजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

जाहिरात

 

घुणकीत डॉ. आंबेडकर यांची १३५ वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी !

schedule14 Apr 26 person by visibility 380 categoryसामाजिक

घुणकी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साधेपणाने पण अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरणपूरक सामाजिक भान जपणारा आदर्श निर्माण करण्यात आला. यावेळी शैक्षणिक वाढीसाठी प्रश्नमंजुषा लहान मुलांचे सांस्कृतिक आणि भाषणे घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गावच्या लोकनियुक्त सरपंच  सुजाता जाधव यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की, डॉ. आंबेडकर यांच्या कार्यामुळेच महिलांना सुरक्षितता आणि सक्षमीकरण लाभले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचा, तुम्ही वाचाल आणि देश वाचेल,” असा संदेश त्यांनी दिला.

त्यानंतर उपसरपंच केशव कुरणे यांच्या हस्ते सभागृहासमोरील निळा ध्वज फडकवण्यात आला. 
त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. 
या उत्सव समितीने प्रश्नमंजुषा स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजापुढे आदर्श ठेवला असल्याचे समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान लहान मुलांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर भाषणे सादर करून उपस्थितांसमोर त्यांचा जीवनपट प्रभावीपणे उलगडला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि सादरीकरणाबद्दल बहुजन युवा क्रांती आघाडीचे संस्थापक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष शहाजी सिद (वस्ताद) यांनी समितीचे कौतुक केले.

यावेळी लोकनियुक्त सरपंच सुजाता जाधव, उपसरपंच केशव कुरणे, वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, वारणा बँकेचे संचालक प्रभाकर कुरणे, ग्राम सदस्य संदीप केर्ले, सदस्य  निलिमा शिंदे, रमेश पाटोळे, जालिंदर पवार, संजय बुडे , संजय गुरव, विकास जाधव, ॲड अक्षय पाटील, जेष्ठ बाबासो कांबळे, राहुल पाटोळे, सुशांत पाटोळे, अनिल डोईफोडे, अजित पाटोळे, कुमार पाटोळे, उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र कांबळे, सचिव गौतम कांबळे, तसेच समितीचे सदस्य अशोक कांबळे, बापूसो कांबळे,अक्षय कांबळे, सुजल सनदी, विकास कांबळे, संतोष कांबळे, जितेंद्र कांबळे, महादेव कांबळे, उदय कांबळे, आदी गावातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes