SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासनशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहातहज यात्रेकरू कोल्हापुरात दाखल !! हज फाऊंडेशन आणि लिम्रास ट्रस्टच्यावतीने जोरदार स्वागत शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर राज्यात प्रथमकोल्हापूर महानगरपालिका : सेवानिवृत्त ७ कर्मचाऱ्यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन प्रा.फंडाच्या रक्कमेचा धनादेश प्रदान

जाहिरात

 

असर्जन येथील स्मशानभूमीसाठी मूलभूत सुविधा देण्याची मागणी; प्रशासनाकडे निवेदन

schedule30 Jun 25 person by visibility 219 categoryसामाजिक

नांदेड : असर्जन येथील स्मशानभूमीत आवश्यक त्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी आज प्रभारी जिल्हाधिकारी  राहुल कीर्डीले आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त  गिरीश कदम यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे सुरज खिराडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशिक ओढणे, चंद्रशेखर पाईकराव, जनता पँथरचे अध्यक्ष आकाश चव्हाण, जयदीप पैठणे, भीम प्रहारचे सम्यक खोसळे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव जयकुमार कुंटे, अमोल पट्टेवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर स्मशानभूमीसाठी पक्का रस्ता, वीज, पाणीपुरवठा, टिनशेड व स्वच्छतागृह यांसारख्या अत्यावश्यक सुविधा सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच निर्णय घ्यावा व स्मशानभूमीची सुविधा पूर्णत्वास न्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes