कोल्हापूर महानगरपालिका : सेवानिवृत्त ७ कर्मचाऱ्यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन प्रा.फंडाच्या रक्कमेचा धनादेश प्रदान
schedule30 Jun 25 person by visibility 343 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या ७ कर्मचाऱ्यांना आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रा.फंडाच्या रक्कमेचा चेक, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या सामान्य प्रशासन, प्रा.फंड, भांडार विभागाच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये दीपा मेजरहत्तर, महेश नलवडे, शांताराम आकुर्डे, विजय पाटील, संभाजी शिंदे, राजेंद्र घरपणकर, राजेंद्र ढाले यांचा समावेश आहे.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना महापालिकेच्या सेवा निवृत्त झालेले कर्मचाऱ्यांनी महापालिकेस सेवा दिली आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता येथून पुढे आपल्या कुटूंबाला वेळ द्यावा. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगून येथून पुढच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, आस्थापना अधिक्षक सुजाता गुरव, भांडार अधिक्षक प्रिती घाटोळे, प्रा.फंड अधिक्षक मकरंद जोशी, सहा.अधिक्षक विशाल सुगते व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.