SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीकाजीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूरडीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी

जाहिरात

 

कोल्हापुरात दररोजचा पाणीपुरवठा पूर्ववत; मात्र वेळेत अर्धा तास कपात

schedule04 May 26 person by visibility 268 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कडक उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरण येथील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, तसेच एल निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरविण्यासाठी महानगरपालिकेने मंगळवार दि.5 मे 2025 पासून पाणीपुरवठ्याबाबत नव्याने नियोजन केले आहे.

महानगरपालिकेकडून यापूर्वी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्र येथून पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला तसेच चंबुखडी बैठी टाकी येथून वितरण होणाऱ्या भागाला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या नियोजनाची चाचणी घेतल्यानंतर मुख्य वितरण नलिका पूर्णपणे रिकाम्या राहत असल्याने त्या पुन्हा भरण्यास विलंब होत होता. परिणामी नियोजित वेळापत्रकानुसार दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी व लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत आज लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार शहर तसेच सलग्न उपनगरांमध्ये मंगळवार, दिनांक 5 मे 2026 पासून पूर्ववत दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, निर्धारीत वेळेत अर्धा तास कपात करून पाणीपुरवठा केला जाणार आहे. भविष्यात उपलब्ध पाणीसाठा, उन्हाळ्याचा कालावधी तसेच पावसाळा लांबल्यास आवश्यकतेनुसार अर्धा तासापेक्षा अधिक वेळ कपात करून दैनंदिन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार असलेचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

तरी नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes