SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतार यांची निवडभविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावायश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहितीजप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलावशक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरु

जाहिरात

 

डीकेटीईच्या विशाल गरजे विद्यार्थ्यांस अमेरिकेतील ओमनिसाकडून ४२ लाख सर्वोत्तम पॅकेजवरती निवड

schedule06 May 25 person by visibility 238 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या कॉम्प्युटर विभागातील विशाल गरजे या विद्यार्थ्यांस ओमनिसा पूर्वीची व्ही एम वेअर, अमेरिका या मल्टिनॅशनल कंपनी कडून सॉफटवेअर डेव्हलपर या पदासाठी निवड झाली आहे. त्याला या कंपनीने वार्षिक ४२ लाखांचे सर्वोच्च पॅकेज दिले आहे. ओमनिसा कंपनी ही व्यवसाय आणि कर्मचा-यांसाठी डिजीटलीकरण अधिक सुलभ व सुरक्षित करण्याचे कार्य करते आणि अशा कार्य करणाऱ्या या प्रतिष्ठित कंपनीमध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची निवड होणे हे संस्थेसाठी गौरवाची बाब आहे. डीकेटीईमधील प्रगत तंत्रसज्ज प्रयोगशाळा, कुशल व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना दिले जाणारे उत्कृष्ट इंडस्ट्री ओरिएंटेड तंत्रज्ञान यामुळे येथे शिकणारे विद्यार्थी जागतिक पातळीवर आपली छाप पाडत आहेत.  

यापूर्वीही डीकेटीईमधील विद्यार्थ्यांनी ४५ लाख, २५ लाख, २२ लाख व १८ लाख इतक्या पॅकेजवर नामांकित कंपन्यामध्ये यशस्वी निवड झालेली आहे त्यामुळे अनेक उच्चस्तरीय कंपन्याचे लक्ष आता डीकेटीईकडे वळले आहे.

ओमनिसा युनिफाईड एडपॉंईट मॅनेजमेंट ची जगभरात कार्यलये असून मुख्यालय मांउटन व्हयू, कॅलिफोर्निया,(अमेरिका) येथे आहे तर अटंलंटा, (जीए अमेरिका), कॉर्क (आर्यलँड), सोफिया (बल्गेरियम), टोकियो (जपान) तर भारतात बेंगलोर येथे कार्यालय आहे. ही कंपनी व्हरच्युअल डेस्कटॉप, ऍप्स, डिजीटल कर्मचारी अनुभव आणि सुरक्षा अनुपलानासाठी उपाय प्रदान करण्यावर लक्ष केंद्रीत करते. ओमनिसा ही एक डिजीटल वर्क प्लॅटफॉर्म लीडर आहे, जी पूर्वी व्हीएमवेअरच्या एंड युजर कॉम्प्युटींग डिव्हीजन म्हणून ओळखली जाते.
 विशालची आंतरराष्ट्रीय स्तरावर ४२ लाखावर झालेली निवड ही डीकेटीईच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि जागतिक स्तरावर उभारलेल्या विश्‍वासाची ठोस पावती आहे.

 विद्यार्थ्यांना सर्वोच्च पॅकेज देणा-या देशातील अघाडीच्या अग्रगण्य संस्थामध्ये डीकेटीईचा समावेश होत आहे ही बाब इचलकरंजीसाठी तसचे सर्व डीकेटीईन्ससाठी अत्यंत अभिमानाची आहे अशी प्रतिक्रीया संचालिका डॉ एल.एस.अडमुठे यांनी व्यक्त केली. विशालच्या या यशाबददल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.अडमुठे, विभागप्रमुख डॉ डी.व्ही. कोदवडे, टीपीओ प्रा. जी.एस.जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 
🟣 मी १२ वी नंतर डीकेटीईमध्ये प्रवेश घेतला, डीकेटीईमध्ये विद्यार्थी असण्याचा सर्वोत्तम अनुभव म्हणजे इथले शिक्षण अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असून, ते विद्यार्थ्यांना यशस्वी कारकीर्द घडविण्यासाठी सक्षम करते. आज मी अमेरिकेतील ओमनिसा या आंतरराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असून मला ओमनिसामध्ये निवड होण्यासाठी डीकेटीई येथे घेतलेले शिक्षण व तंत्रज्ञान यांची खूप मदत झाली आहे.  आज मी विविध प्रोजेक्टस व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर काम करत असताना डीकेटीईमध्ये मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाचा मोठा फायदा होत आहे. इथल्या समृध्द शैक्षणिक संसाधानांमुळे मला माझ्या पदवी अभ्यासक्रमामध्ये विविध प्रकल्प राबविण्याची व पूर्ण करण्यासाठी तांत्रिक ज्ञान मिळाले आणि म्हणून हे यशाचे शिखर सर करु शकलो आहे. : विशाल गरजे

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes