SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विभागीय क्रीडा संकुलाच्या १९५ कोटींच्या सुधारित आराखड्यास विभागीय समितीची मंजुरीकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसंजय घोडावत ग्रुप व वारणा उद्योग समूह यांच्या संयुक्त उपक्रमातून पहिल्या विमान प्रवासाची स्वप्नपूर्तीकामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकरजेव्हा पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा ...२ मार्चपासून सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होणारविशेष संख्याशास्त्रीय सादरीकरणात कवठेमहांकाळचे महाविद्यालय प्रथममुंबईचे महापौर, उपमहापौर, पदाधिकारी सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटनसाहित्य, समाज, वास्तवाशी जोडलेले चित्रपट हे प्रभावी माध्यम : डॉ. डेल्फिम द सिल्वा; शिवाजी विद्यापीठात ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

जाहिरात

 

शाश्वत कृषी विकासासाठी विविध विद्याशाखांत समन्वय आवश्यक : डॉ. ज्योती जाधव

schedule11 Feb 26 person by visibility 165 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शाश्वत कृषी विकासासाठी हवामान, पर्यावरण आणि संख्याशास्त्र या विविध विद्याशाखांमध्ये संतुलित समन्वय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा संख्याशास्त्र अधिविभाग आणि शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “दिवंगत डॉ. सुलोचना गाडगीळ आणि डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाश्वत कृषीसाठी हवामान, पर्यावरण व सांख्यिकी” या पीएम-उषा पुरस्कृत कार्यशाळा सोमवारी (दि. ९) झाली. यावेळी उद्घाटन समारंभामध्ये डॉ. जाधव बोलत होत्या.

प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, शाश्वत शेती, पर्यावरणीय समतोल आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आंतरविद्याशाखीय संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. सांख्यिकी, जीवनविज्ञान, पर्यावरणशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समन्वय भविष्यातील संशोधन कार्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावणार आहे. 

कार्यशाळेचे संसाधन व्यक्ती डॉ. अनिल गोरे यांनी हवामानविषयक माहिती, पर्जन्यमानाचे विश्लेषण आणि कीड-रोग नियंत्रणासाठी सांख्यिकी पद्धतींचा उपयोग यावर सविस्तर मार्गदर्शन केले.  महाराष्ट्रातील पावसावर अवलंबून शेती, पिकांवरील कीड व बुरशीजन्य रोग, तसेच रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी डेटा-आधारित निर्णय प्रणाली या विषयांवर कार्यशाळेत सखोल चर्चा झाली.

कार्यशाळेस संख्याशास्त्र, वनस्पतिशास्त्र, पर्यावरणशास्त्र, प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या कार्यशाळेच्या आयोजनासाठी अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. सोमनाथ पवार, सुकुमार राजगुरू आणि डॉ. सचिन पाटील यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes