SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यतामाजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

जाहिरात

 

आंबेडकर जयंतीनिमित्त हेरवाडमध्ये आरोग्यसेवेचा स्तुत्य उपक्रम : ४० लिटर कफ सिरपचे वितरण

schedule14 Apr 26 person by visibility 202 categoryसामाजिक

कोल्हापूर  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेरवाड गावात समाजसेवेचा आदर्श घालून देणारा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक बांधिलकी जपत सरपंच  रेखा अर्जुन जाधव व त्यांच्या परिवाराच्या वतीने आरोग्य उपकेंद्र, हेरवाड येथे रुग्णांसाठी तब्बल ४० लिटर कफ सिरपचे वितरण करण्यात आले.

सध्या बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढत असताना या औषधांचे वितरण रुग्णांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या मदतीमुळे अनेक रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले असून सर्व स्तरांतून सरपंच  रेखा अर्जुन जाधव व त्यांच्या परिवाराचे कौतुक होत आहे. “समाजसेवा हीच खरी मानवसेवा” या विचारातून प्रेरित होऊन करण्यात आलेल्या या कार्याने आंबेडकर जयंतीला वेगळी सामाजिक दिशा दिली आहे.

यावेळी गटनेते सुनील माळी, बी. एम. देशमुख सर, अमोल कांबळे, संदीप कांबळे, विशाल कांबळे, सुकुमार पाटील, दत्तात्रय जोंधळे, आयाज मुल्ला, रोहन मोहिते, आरोग्यसेवक शरद कोळी, डॉ. गिरमल मॅडम, आरोग्यसेविका तेली सिस्टर तसेच आशासेविका शशिकला कांबळे व दिपाली कांबळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes