SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जेष्ठांचा अनुभव हीच व्यवसायाची शिदोरी; कोल्हापुरात अमृतमहोत्सवी व्यापाऱ्यांचा दिमाखदार सत्कारमागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णयकोल्हापूरकरांनो लक्ष द्या! परीख पूल परिसरात वाहतुकीत मोठे बदल; ४५ दिवस 'हे' मार्ग राहणार बंदकोल्हापूरकरांचा प्रवास सुसह्य होणार; नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर आता पोलीस प्रशासनाची करडी नजर!आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकरजाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाददर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ : महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमबारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाववन्यजीव: पृथ्वीचा अनमोल ठेवा आणि आपल्या अस्तित्वाचा आधार!

जाहिरात

 

राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

schedule03 Mar 26 person by visibility 79 categoryआरोग्य

मुंबई : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरूपात वेगाने राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या सर्व मोहिमा युद्धपातळीवर सुरू असून २८ फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी अत्यंत उत्साहवर्धक आहे.

▪️"अरुणोदय" सिकलसेल अॅनेमिया विशेष अभियान

१५ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या "अरुणोदय" सिकलसेल अभियानांतर्गत गृहभेटीद्वारे ७३ लाख ४५ हजार २६६ व्यक्तींची (वय ० ते ४० वर्षे) नोंद करण्यात आली. यापैकी ५३ लाख ४७ हजार ९३३ व्यक्तींची तपासणी पूर्ण झाली असून १,६४५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. तसेच २७,११२ नवीन वाहक आढळून आले आहेत.

▪️राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम

८ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३८१ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. हर्निया, क्लेफ्ट लिप यासह इतर २२,५३९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

▪️गरोदर मातांना आयव्ही आयर्न उपचार

तीव्र रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांसाठी १ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष उपचार मोहीम राबविण्यात आली. ५,२३१ मातांमध्ये तीव्र रक्तक्षय निश्चित करण्यात आला असून त्यापैकी ४,५८० मातांना इंजेक्शन आयर्न सुक्रोज व फेरिक कार्बोक्सी माल्टोज उपचार देण्यात आले आहेत.

▪️हत्तीरोग शस्त्रक्रिया व सार्वत्रिक औषधोपचार मोहीम

हत्तीरोग (अंडवृद्धी) निर्मूलनासाठी ९९३ पात्र रुग्णांपैकी जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ६०१ रुग्णांवर शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. यात गडचिरोली येथे २१६ तर चंद्रपूर येथे १३० शस्त्रक्रियांचा समावेश आहे. सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेंतर्गत (एमडीए) ३३ लाख २२ हजार ६७९ पात्र लोकसंख्येपैकी २९ लाख ४१ हजार ५५४ जणांनी औषधसेवन केले असून एकूण कव्हरेज ८८.५३ टक्के इतके झाले आहे.

▪️मलेरिया मुक्त गडचिरोली अभियान

गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी २९ हायरिस्क प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८४,७३२ LLIN लाँग लास्टींग इनसेक्टीसायड नेट (एलएलआयएन) मच्छरदाण्यांचे वितरण करण्यात आले. यात आश्रमशाळांसाठी १२,२१७ तर हायरिस्क क्षेत्रासाठी ७२,५१५ मच्छरदाण्यांचा समावेश आहे. आयसीएमआर - एनआयएमआरच्या सहकार्याने सहा संशोधन प्रकल्पही राबविण्यात येत आहेत.

▪️क्षयरुग्णांना फूड बास्केट वितरण

क्षयरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत राज्यात ३६,५०७ निक्षय मित्रांची नोंदणी झाली असून १ लाख ५७ हजार ९०४ रुग्ण उपचाराधीन आहेत. यापैकी १ लाख १२ हजार ८३८ रुग्णांची संमती घेऊन ३७,५८७ अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले आहे.

▪️कुष्ठरुग्ण सहवासितांना प्रतिबंधात्मक उपचार

राज्यात १६,७६१ कुष्ठरुग्ण उपचाराधीन असून ४ लाख ४७ हजार २९६ सहवासितांची नोंदणी झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३ लाख २५ हजार ४६० जणांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले. त्यानंतर २६ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आणखी ४२,००१ जणांना अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले आहे.

 
▪️राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग विशेष तपासणी मोहीम

१ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत उच्च रक्तदाबासाठी २५ लाख ८२ हजार ९९२ जणांची तपासणी झाली, त्यापैकी १० लाख ५ हजार ७०४ जणांना निदान व उपचार सुरू करण्यात आले. मधुमेहासाठी १२ लाख ५२ हजार ४३४ तपासण्या होऊन २ लाख ८८ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मौखिक, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाच्या तपासण्याही मोठ्या प्रमाणात पार पडल्या असून संशयित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

▪️नवीन आरोग्य संस्था कार्यान्वित करण्याचा संकल्प

राज्यात पूर्णपणे बांधकाम झालेल्या नवीन आरोग्य संस्थांना आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व संस्था कार्यान्वित करण्याचा शासनाचा दृढ संकल्प आहे.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी नागरिकांना आरोग्य विभागामार्फत यापुढेही राबविण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes