SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विनायक भोसले यांचा 'लायन्स गौरव' पुरस्काराने सन्मान गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीकाजीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

जाहिरात

 

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे बुधवारपासून आयोजन : परिवहन सभापती सत्यजित जाधव, राजेंद्र कुरणे यांची माहिती

schedule17 Mar 26 person by visibility 257 categoryक्रीडा

🔸विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषकाचे बक्षीस : चालू वर्षातील सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत "चंद्रकांत चषक -२०२६" फुटबॉल स्पर्धेला १८ मार्च पासून शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, त्याच बरोबर उपांत्य फेरीत येणाऱ्या संघांना प्रत्येकी ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर महापालिका परिवहन समितीचे सभापती सत्यजित  जाधव व राजेंद्र कुरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीन १८ मार्च ते २९ मार्च या कालावधीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार व विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती संभाजी जाधव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या हस्ते बुधवारी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे.  

स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांचे भव्य पोस्टर उभारण्यात येणार आहे. तसेच शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी वरिष्ठ 16 संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे बॅनर लावण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ व उत्कृष्ट फॉरवर्ड या चार खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू आणि गौरव चिन्ह, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ३१ हजार रुपये, गौरव चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवले जाणार आहे. प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळवणाऱ्या खेळाडूला ३१०० रूपये बक्षिस देण्यात येणार आहे.


यावेळी उपाध्यक्ष निवास शिंदे, सेक्रेटरी राहुल चव्हाण, जॉईन सेक्रेटरी आप्पासाहेब साळोखे, युवराज कुरणे, रोहन शिंदे, सुदेश मगदूम, सुनील पोवार, कपिल मोहिते, अनिकेत सावंत आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes