SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यतामाजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

जाहिरात

 

केआयटीच्या आदित्य साळुंखेस रु.२७.५० लाखाचे पॅकेज; ‘बेट्टी ब्लॉक्स ’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड

schedule14 Apr 26 person by visibility 590 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी  (प्रदत्त स्वागत) महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम या विभागातील आदित्य साळुंखे या विद्यार्थ्याची ‘बेट्टी ब्लॉक्स’ आंतरराष्ट्रीय स्तरावरील आय.टी.कंपनीमध्ये निवड झाली असून त्याला कंपनीने रु.२७.५० लाखाचे पॅकेज घोषित केले आहे.

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, उद्योगांशी एकात्मिक शिक्षण पद्धती, प्रगत प्रयोगशाळांमध्ये प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) अनुभवाची संधी आणि कंपनी-विशिष्ट प्रशिक्षण यामुळे केआयटीमध्ये उत्तम प्लेसमेंट्स साध्य होत आहेत.अशा भावना आदित्य साळुंखे या विद्यार्थ्याने व्यक्त केल्या.

विद्यार्थी व विद्यार्थिनीना संरक्षित तसेच कौशल्य विकासासाठी पोषक वातावरण, सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स, १०,००० हून अधिक ई-पुस्तकांचा डिजिटल लायब्ररीचा समृद्ध साठा आणि उच्च पात्रता व संशोधनाभिमुख प्राध्यापकवर्ग यांनी अशा प्लेसमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.अशा प्रकारचे मनोगत संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केले.

कंपनीच्या कार्य शैलीची व निवड प्रक्रीयेची विद्यार्थ्यांमध्ये वेळे आधीच जागृती केली जाते.प्रोत्साहन,प्रबोधन व प्रशिक्षण या त्रिसूत्रीच्या मुळेच अशा प्रकारचे यश विद्यार्थी मिळवत आहेत असे मत संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्यांमुळे तसेच कामातील व व्यवहारातील प्रामाणिकतेमुळे विविध क्षेत्रांतील अनेक नामांकित कंपन्या केआयटीमध्ये प्लेसमेंटसाठी उत्सुकता दर्शवत असून, त्या कॉलेजशी सातत्याने संपर्क साधत आहेत, असा अनुभव संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन यांनी व्यक्त केला.

संस्थेच्या वतीने विद्यार्थी आदित्य साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.साजिद हुदली ,उपाध्यक्ष श्री सचिन मेनन सचिव श्री दीपक चौगुले,विश्वस्त श्री.दीपक जोशी,संचालक डॉ. मोहन वनरोट्टी व कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम विभागाचे विभाग प्रमुख डॉ.मंजुनाथ हुदगी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes